०६-डिसेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, December 06, 2023, 09:58:07 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.१२.२०२३-बुधवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                "०६-डिसेंबर-दिनविशेष"
                               -----------------------

-: दिनविशेष :-
०६ डिसेंबर
समता दिन
========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०००
थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
१९९९
जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला 'ऑलिम्पिक ऑर्डर' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
१९९२
अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.
१९८१
डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली 'पोलर सर्कल' या जहाजातून भारताची एक तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली. ही तुकडी ९ जानेवारी १९८२ रोजी रात्री साडेबारा वाजता अंटार्क्टिकावर पोचली. भारत हा अंटार्क्टिका मोहीम करणारा तेरावा देश बनला.
१९७८
स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.
१९७१
भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
१९१७
फिनलँड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.
१८७७
द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.
========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९३२
कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक
(मृत्यू: २७ जानेवारी २००७)
१९२३
वसंत सबनीस
रघुनाथ दामोदर तथा वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार. विच्छा माझी पुरी करा (१९६८) ह्या त्यांच्या लोकनाटयाने यशस्वितेचा विक्रम केला.
(मृत्यू: १५ आक्टोबर २००२)
१९१६
'गंधर्व भूषण' जयराम शिलेदार – गायक व नट
(मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९२)
१८६१
रेव्हरंड नारायण वामन तथा ना. वा. टिळक – कवी व लेखक
(मृत्यू: ९ मे १९१९)
१८५३
हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार
(मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३१)
१८२३
मॅक्समुल्लर
मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत
(मृत्यू: २८ आक्टोबर १९००)
१७३२
वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल
(मृत्यू: २२ ऑगस्ट १८१८)
१४२१
हेन्‍री (सहावा) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: २१ मे १४७१)
========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१३
नेल्सन मंडेला तथा 'मदीबा' – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते
(जन्म: १८ जुलै १९१८)
१९७६
क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, 'पत्री सरकार'चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार
(जन्म: ३ ऑगस्ट १९००)
१९७१
कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक
(जन्म: १ जानेवारी १९०२)
१९५६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली.
(जन्म: १४ एप्रिल १८९१)
========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.12.2023-बुधवार.
========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
========================================