दिन-विशेष-लेख-आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस-A

Started by Atul Kaviraje, December 07, 2023, 10:17:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                    "दिन-विशेष-लेख"
                      "आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस"
                     --------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-07.12.2023-गुरुवार आहे. ७ डिसेंबर, हा दिवस "आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन दरवर्षी ७ डिसेंबर रोजी जगाच्या विविध भागात हा दिवस साजरा करते. १९९४ मध्ये आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिनाची स्थापना करण्यात आली. यूएन जनरल असेंब्लीने संयुक्त राष्ट्र प्रणालीमध्ये १९९६ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन दिवस म्हणून औपचारिकपणे मान्यता दिली.

        Why International Civil Aviation Day is celebrated today, know the reason--

      International Civil Aviation Day | पाहा आज का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन...

     एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी हवाई प्रवास हा एक वेगवान आणि आरामदायी मार्ग आहे. मात्र आजही जगभरातील अनेक गरीब देश किंवा विकसनशील देशांतील अनेकांसाठी हवाई प्रवास हे एक स्वप्नच आहे. जगभरातील सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी नागरी उड्डाणाचे महत्त्व अधोरेखित करत २०१३ पासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

     आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन थोडं पण कामाचंहवाई प्रवास हा जगभरातील वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भागदरवर्षी ७ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन साजरा केला जातो७ डिसेंबर २०१३ आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला

     नवी दिल्ली : हवाई प्रवास (Air Travel)हा जगभरातील वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग झाला आहे. आज ७ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन (International Civil Aviation Day 2021) आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी हवाई प्रवास  हा एक वेगवान आणि आरामदायी मार्ग आहे. मात्र आजही जगभरातील अनेक गरीब देश किंवा विकसनशील देशांतील अनेकांसाठी हवाई प्रवास हे एक स्वप्नच आहे. अर्थात देशातील अनेक छोट्या शहरांना हवाई प्रवासासाठी जोडण्यासाठी उडान योजना (Udan Yojna)राबवण्यात येत आहे. जगभरातील सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी नागरी उड्डाणाचे महत्त्व अधोरेखित करत २०१३ पासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. अर्थातच जरी ७ डिसेंबर २०१३ आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला असला तरी याचे इतिहासाशी जुने नाते आहे. (Why International Civil Aviation Day is celebrated today, know the reason)

            याच दिवशी शिकागोत झाल्या होत्या सह्या--

     हवाई प्रवासाच्या क्षेत्रात सुरक्षा आणि सावधगिरी यांना चालना देण्यासाठी या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटना किंवा संस्थांमध्ये अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिनाचे महत्त्व आहे. जगभरातील मानकांसाठी आयसीएसओ ही हवाई प्रवासातील सुरक्षेसाठीच्या आंतरराष्ट्रीय मानकांसाठी काम करते आणि ही संस्था संयुक्त राष्ट्रसंघाचाच एक भाग आहे. ७ डिसेंबरलाच आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन साजरा केला जाण्यामागे १९४४ मध्ये शिकागोमध्ये याच दिवशी इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन करारावर सह्या होणे हे आहे.

         सामाजिक आणि आर्थिक विकासातील महत्त्व याची जागरुकता वाढवणे--

     नागरी उड्डाण प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि एकजिनसीपणा साधण्यासाठी ७ डिसेंबर १९४४ला इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाणाचे सामाजिक आणि आर्थिक विकासातील महत्त्व यासंदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन अनेक जागतिक संघटनांसोबत मिळून काम करते. यामध्ये जागतिक मोसम विभाग, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना, युनिव्हर्सल पोस्टल युनियन, जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रसंघ इत्यादींचा समावेश आहे.

     देशातील अधिकाधिक भागात हवाई सेवा पोहोचावी यासाठी केंद्रातील मोदी सरकारने (Modi government) (UDAN) योजना आणली. या योजनेअंतर्गत हवाई सेवा (air service) लहान शहरांमध्ये सुरू करण्यात येत आहे. या दिशेने एक पाऊल पुढे जात सरकारने नवीन विमानतळ, हेलिपॅड आणि नवीन हवाई मार्ग सुरु करण्याची घोषणा केली आहे. मोदी सरकारची ही नवी विमान वाहतूक सुधारणा आहे.

     योजनेनुसार 5 विमानतळ गुजरातमधील केशोद, झारखंडमधील देवघर, महाराष्ट्रातील गोंदिया आणि सिंधुदुर्ग याशिवाय उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये बांधले जातील. हिमाचल प्रदेशातील शिमला, मनाली, मंडी आणि बद्दी याशिवाय उत्तराखंडमधील हल्दवानी आणि अल्मोडा येथे हेलिपॅड बांधले जातील.

--विजय तावडे
-------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.12.2023-गुरुवार.
========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
========================================