दिन-विशेष-लेख-आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस-B

Started by Atul Kaviraje, December 07, 2023, 10:19:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                       "आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस"
                      --------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-07.12.2023-गुरुवार आहे. ७ डिसेंबर, हा दिवस "आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

            आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस--

     संयुक्त राष्ट्रांच्या १९९६मध्ये झालेल्या बैठकीत ७ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन म्हणून साजरा करावा, असे ठरले.

            आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस--

     जोसेफ तुस्कानोसंयुक्त राष्ट्रांच्या १९९६मध्ये झालेल्या बैठकीत ७ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन म्हणून साजरा करावा, असे ठरले. त्याच्या दोन वषेर् आधीपासून इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन हा दिवस साजरा करीत आहे. विमान वाहतूक दिनांसाठी तयार करण्यात आलेली घोषवाक्ये तर त्यांच्या उत्क्रांतीची द्योतक आहेत.१९९५ पासूनची घोषवाक्ये :१९९५ : विमानांचे आपल्या जीवनातील स्थान१९९६ : विमानवाहतुकीच्या सुरक्षेसाठी उपग्रहांचा वापर१९९७ : जागतिक पातळीवरील सहकार्याने विमान वाहतुकीची वाढती सुरक्षा१९९८ : एकविसाव्या शतकातील सुरक्षित विमान-भरारी१९९९ : विश्वमैत्री व सामंजस्याला प्रोत्साहन२०००: विमान वाहतुकीच्या क्षमता आणि सुरक्षेत आधुनिक तंत्रज्ञानाने वाढ२००१ : दोन देशांतील उड्डाणे: दोन देशांतील संवाद२००२ : शतकभरातील टिकाऊ वाहतूक२००३ : आंतरराष्ट्रीय प्रमाणबद्घ विमानवाहतुकीची ६० वषेर्२००४ : आंतरराष्ट्रीय परस्पर सहकार्य हाच विश्व विमान वाहतुकीतील आव्हानावरचा उपाय२००५ : पर्यावरण रक्षणासाठी कटीबद्घ नागरी विमानवाहतूक२००६ : संरक्षक आणि सुरक्षित प्रवास यांनाच प्रथम प्राधान्य२००७ : आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक

     आथिर्क, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीची गुरूकिल्ली२००८ : कौशल्यपूर्ण हवाई तज्ज्ञांना संधी म्हणजेच उद्याची हवाई वाहतूक२००९ : विमान वाहतुकीद्वारा ६५ वर्षांची विश्व समाजबांधणीविमान वाहतुकीशी निगडीत या टप्प्यांचे अवलोकन केले तर सामाजिक प्रगती आणि पर्यावरणाचे रक्षण यांच्याशी या खात्याचे घनिष्ठ संबंध आहेत, हे लक्षात येते. त्याचप्रमाणे, सध्याच्या दहशतवाद्यांच्या सुळसुळाटात ही उपयुक्त वाहतूक असुरक्षेच्या घेऱ्यात सापडली आहे, याचेही भान ठेवावे लागते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे या अडसरांवर मात करण्यात यश येत असले, तरीही गाफीलता किंवा इंजिन यंत्रणेतील बिघाड प्रचंड वित्तहानी आणि जीवितहानीस कारणीभूत ठरू शकतो.

-- महाराष्ट्र टाइम्स.कॉम
---------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.12.2023-गुरुवार.
========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
========================================