०८-डिसेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, December 08, 2023, 10:29:21 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०८.१२.२०२३-शुक्रवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे"दिनविशेष"

                                 "०८-डिसेंबर-दिनविशेष"
                                -----------------------

-: दिनविशेष :-
०८ डिसेंबर
राष्ट्रीय मतिमंद पुनर्वसन दिन
जपानमध्ये हा दिवस बोधी दिवस (Bodhi Day) म्हणून साजरा केला जातो.
========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९७१
भारत पाक युद्ध – भारतीय आरमाराने पाकिस्तानातील कराची बंदरावर हल्ला केला.
१९४१
दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलँड, हाँगकाँग, फिलिपाइन्स व डच इस्ट इंडिज वर हल्ला केला. याच्या एकच दिवस आधी जपानने अमेरिकेतील पर्ल हार्बरवर हल्ला चढवला होता.
१७४०
दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला. मानाजी आंग्रे आणि खंडोजी मानकर यांच्या नेतृत्वाखाली मराठी आरमाराने हा विजय मिळवला.
========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९४४
शर्मिला टागोर
शर्मिला टागोर – चित्रपट अभिनेत्री
१९३५
धर्मेन्द्र
धर्मेन्द्र – चित्रपट अभिनेता
१९००
उदय शंकर
उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२) व फेलोशिप विजेते. त्यांनी अल्मोडा येथे 'इंडिया कल्चरल सेंटर'ची स्थापना केली.
(मृत्यू: २६ सप्टेंबर १९७७ - कोलकाता)
१८९७
नारायण सदाशिव मराठे तथा 'केवलानंद सरस्वती' – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक
(मृत्यू: १ मार्च १९५५)
१८९७
पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ 'नवीन' – हिन्दी कवी. हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्‍न केले.
(मृत्यू: २९ एप्रिल १९६०)
१७६५
एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक
(मृत्यू: ८ जानेवारी १८२५)
१७२१
नानासाहेब पेशवा
बाळाजी बाजीराव भट तथा 'नानासाहेब पेशवा' – मराठा साम्राज्यातील आठवा पेशवा
(मृत्यू: २३ जून १७६१ - पर्वती, पुणे)
========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९४७: भारताचे स्वातंत्र्य सैनिक भाई परमानन्द यांचे निधन.

१९७८: गोल्डा मायर – शिक्षिका व इस्त्रायलच्या ४ थ्या पंतप्रधान (जन्म: ३ मे १८९८)

२००४: प्रसिद्ध कॅमेरामन सुब्रतो मित्रा यांचे निधन.

२०१३: नोबेल पारितोषिके ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक जॉन कॉर्नफॉथ यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१७)

२०१५: जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये विधार्थ्यांचे आवडते आणि प्रसिद्धी असलेले लेखक रमाशंकर यादव यांचे निधन.
========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.12.2023-शुक्रवार.
========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
========================================