दिन-विशेष-लेख-संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती-अभंग-A

Started by Atul Kaviraje, December 08, 2023, 10:00:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                       "संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती"
                      ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

    आज दिनांक-08.12.2023-शुक्रवार आहे. 0८ डिसेंबर, हा दिवस "संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

          संत संताजी महाराज जगनाडे अभंग गाथा १ ते १०--

========================================
तेली संत-श्री संताजी महाराज जगनाडे--

तेली समाज गुरु-गुरु गोरखनाथ
नाव-संत श्री संताजी विठोबा जगनाडे
जन्म-८ डिसेंबर १६२४ मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी
जन्मस्थळ-सुदुंबरे, तालुका- मावळ, महाराष्ट्र
समाधी-इ.स १६८८
वडील-विठोबा भिवाजी जगनाडे
आई-मथुबाईं (मथाबाई किंवा माथाबाई,)
पत्नी-यमुनाबाई
मुलगा-बाळोजी
मुलगी-भागू (भागूबाई)
समाज-तेली
गुरु-संत तुकाराम
साहित्य-'तेलसिंधु', 'शंकरदीपिका'
कार्य-संत तुकाराम महाराज अभंग गाथा लेखन, भजन, किर्तन, ज्ञानदान.
========================================

     संत संताजी महाराज जगनाडे यांचा जन्म मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला पुणे जिल्ह्यातील चाकण येथे झाला. अंदाजे इ.स. १६२४ दरम्यान झाला,

     समाधी – मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी इ. स. १६८८ साली संताजी महाराजांनी देह ठेवला.

     ९ फेब्रवारी २००९ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या काळात त्यांच्यावरील एक पोस्टाचं तिकीटही निघालं. संत संताजी महाराज जगनाडे हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे – अर्थात तुकाराम गाथेचे – लेखनिक करीत.

           संत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग--

     जो पर्यंत संतू तेली व संताजी जगनाडे हे भिन्न आहेत, हे निश्चित होत नाही, तोपर्यंत प्रस्तुत – अभंग संताजी महाराज जगनाडे यांचेच आहेत असे मानावेच लागते

           घाण्यावरील अभंग--

अभंग १--
माझिया जातीचा मज भेटो कोणी ।
आवडिची धनी पुरवावया ॥१॥
माझिया जातीचा मजशीं मिळेल ।
कळेल तो सर्व समाचार ॥२॥
संतु म्हणे येथें पाहिजे जातीचे ।
येरॅं गबाळाचें काम नाही ॥३॥

अभंग २--
एकादिशी दिनी संतु तुका वाणी ।
राऊळा आंगणी उभे होते ॥१॥
तेव्हा संतु तेली गेलासे दर्शना ।
पांडुरंग चरणा नमियेले ॥२॥
तेथुनी तो आला तुका जेथें होतां ।
आलिंगन देतां झाला त्याशीं॥३॥
तुका म्हणे संतु पुसतो तुजला ।
सांगतो तुजला संतु म्हणे ॥४॥

अभंग ३--
तुजशीं तें ब्रह्मज्ञान कांहीं आहे ।
किंवा भक्तिमाय वसे पोटी ॥ ॥१॥
काय तुझ्या मागें कोण तुज सांगे ।
काय ते अभंग जाणितले ॥२॥
घाणाची घेऊनी बैसलासि बुधा ।
जन्म पाठिमागा कां गेला ॥॥३॥
तुका म्हणे सर्व सांग तुं मजला ।
सांगतों तुजला संतु म्हणे ॥४॥

--धनंजय महाराज मोरे
--------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-वारकरी रोजनिशी.इन)
                    ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.12.2023-शुक्रवार.
========================================