दिन-विशेष-लेख-संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती-अभंग-B

Started by Atul Kaviraje, December 08, 2023, 10:02:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                       "संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती"
                      ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

    आज दिनांक-08.12.2023-शुक्रवार आहे. 0८ डिसेंबर, हा दिवस "संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

            संत संताजी महाराज जगनाडे अभंग गाथा १ ते १०--

अभंग ४--
मजशीं तें ब्रह्मज्ञान काहीं नाहीं ।
आपुल्या कॄपेनें होईल सर्वथाहीं ॥ ॥१॥
होइल मज आणि माझिया कुळांशीं ।
पांडुरंग मुळाशीं सर्व आहे ॥२॥
संतु म्हणे ब्रह्म ब्रह्मा सर्व जाणे ।
आपुलें तें मन सुधारलें ॥३॥

अभंग ५--
भक्ति ते माऊली माझे नच पोटी ।
जाणें उठा उठी देवराया ॥ ॥१॥
भक्ति या भावाची करूनिया लाट ।
आलिंगितो तीस रात्रंदिन ॥२॥
संतु म्हणे आपुल्या कृपेचा प्रसाद
द्यावा वारंवार मजलागी ॥३॥

अभंग ६--
मज मागें घाणा सांगे द्वारकेचा राणा ।
मज मागें संसार सांगे रूक्मिणीचा वर ॥१॥
मज मागें घेव देव सांगे रुक्मिणीचा राव ।
मज मागें निद्रा आहार सांगे उमा सारंगधर ॥२॥
किर्तीविना कांहीं मागें तें राहिना ।
संतु सांगे खुणा तुकयाशी ॥३॥

अभंग ७--
ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग ।
देह आपुला भंगतो माति मिळोनियां जातो ॥१॥
त्याचें होइनाच काहीं अंतरीं शोधुनियां पाही ।
प्राण जातो यमपाशीं दुःख होतें ते मायेशीं ॥२॥
संतु म्हणे असा अभंग गाईला ।
पुझें चालुं केला देहावरी ॥३॥

अभंग ८--
जन्मलों मी कुठे सांगतां नये कांहीं ।
निरंजन निराकार आधार नव्हतां ठाई ॥१॥
तेथें मी जन्मलों शोधुनियां पाही ।
जन्मले माझें कुळ आशेच सर्वही ॥२॥
असाच हा जन्म पाठी मागा गेला ।
पुन्हा नाहीं आला कदा काळीं ।॥३॥
संतु म्हणे वनमाळी ।
चुकवा जन्माची हे पाळी ॥४॥

अभंग ९--
सगुण हा घाणा घेऊनि बैसलों ।
तेलीजन्मा आलों घाणा घ्याया ॥१॥
नाहीं तर तुमची आमची एक जात ।
कमी नाहीं त्यांत आणु रेणु ॥२॥
संतु म्हणे जाती दोनच त्या आहे ।
स्त्री आणि पुरुष शोधुनिया पाहे ॥३॥

अभंग १०--
आमुचा तु घाणा त्रिगुण तिळाचा ।
नंदी जोडियला मन पवनाचा । ॥१॥
भक्ति ही भावाची लाट टाकियली ।
शांती शिळा ठेवली विवेकावरी ॥२॥
सुबुद्धीची वढ लावोनी विवेकांस ।
प्रपंच जोखड खांदी घेतीयले ॥॥३॥
फेरे फिरो दिले जन्मवरीं ।
तेल काढियलें चैतन्य तें ॥॥४॥
संतु म्हणे मी हे तेल काढियले ।
म्हणूनी नांव दिले संतु तेली ॥५॥

--संत श्रीसंताजीमहाराज जगवाडे – अभंग समाप्त

--धनंजय महाराज मोरे
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-वारकरी रोजनिशी.इन)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.12.2023-शुक्रवार.
========================================