दिन-विशेष-लेख-जागतिक मानवी हक्क दिवस-B

Started by Atul Kaviraje, December 10, 2023, 09:57:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                    "दिन-विशेष-लेख"
                              "जागतिक मानवी हक्क दिवस"
                             ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-10.12.2023-रविवार आहे. १० डिसेंबर, हा दिवस "जागतिक मानवी हक्क दिवस" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

         Human Rights Day: आज आहे जागतिक मानवाधिकार दिन, जाणून घ्या इतिहास आणि यंदाची थीम--

     संयुक्त राष्ट्र संघाने 10 डिसेंबर 1948 रोजी मानवाधिकारांचा सार्वत्रिक जाहीरनामा जारी करून प्रथमच मानवाच्या हक्कांबद्दल बोलले. 1950 मध्ये सर्व देशांना आमंत्रित करण्यात येऊन या दिवसाची अधिकृत घोषित करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी 10 डिसेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.

              जागतिक मानवाधिकार दिन--

     जगभरात दरवर्षी 10 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा केला जातो. 10 डिसेंबर 1948 रोजी प्रथमच संयुक्त राष्ट्र संघाने (UN ) मानवाधिकार स्वीकारण्याची घोषणा केली. मात्र याची अधिकृतपणे घोषणा 10 डिसेंबर 1950 रोजी करण्यात आली. 1950 मध्ये सर्व देशांना आमंत्रित केल्यानंतर सभेत ठराव 423 (V) पास केला आणि सर्व देशांना आणि संबंधित संस्थांना हा दिवस साजरा करण्याबाबत सूचित केले.

             हा आहे इतिहास--

     संयुक्त राष्ट्र संघाने 10 डिसेंबर 1948 रोजी मानवाधिकारांचा सार्वत्रिक जाहीरनामा जारी करून प्रथमच मानवाच्या हक्कांबद्दल सांगितले. 1950 मध्ये सर्व देशांना आमंत्रित करण्यात येऊन या दिवसाची अधिकृत घोषित करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी 10 डिसेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा 500 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्याचवेळी भारतात 28 सप्टेंबर 1993 पासून मानवी हक्क कायदा लागू झाला आणि 12 ऑक्टोबर 1993 रोजी 'राष्ट्रीय मानवाधिकार आयोग' ची स्थापना झाली.

     राष्ट्रीय मानवाधिकार आयोग राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य क्षेत्रातही काम करतो. या अंतर्गत  नागरिकांना वेतन, एचआयव्ही एड्स, आरोग्य, बालविवाह, महिलांचे हक्क याबाबत जागरूक केले जाते.

             ही आहे यंदाची थीम--

     दरवर्षी, एका थीमवर जागतिक मानवाधिकार दिन साजरा केले जातो. त्यानुसार, मानवाधिकार दिन 2022 ची थीम, 'सर्वांसाठी सन्मान, स्वातंत्र्य आणि न्याय'  ही आहे.

         भारतीय नागरिकांचे हे आहे मूलभूत अधिकार--

भारतात नागरिकांच्या मूलभूत हक्कांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यानुसार घटनेत,
अनुच्छेद 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार
अनुच्छेद 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार
कलम 23 ते 24 मध्ये शोषणाविरुद्धचा हक्क
अनुच्छेद 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार
अनुच्छेद 29 ते 30 मध्ये संस्कृती आणि शिक्षणाचा अधिकार
अनुच्छेद 32 मध्ये घटनात्मक अधिकार दिलेला आहे.

--By Vikas Chavhan
-----------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इंडिया.कॉम)
                       --------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.12.2023-रविवार.
========================================