दिन-विशेष-लेख-अल्फ्रेड नोबेल दिवस-D

Started by Atul Kaviraje, December 10, 2023, 10:11:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                                 "अल्फ्रेड नोबेल दिवस"
                                ---------------------
                                                   
मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-10.12.2023-रविवार आहे. १० डिसेंबर, हा दिवस "अल्फ्रेड नोबेल दिवस" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

           नोबेल पुरस्काराचे जनक अल्फ्रेड नोबेल यांच्या जीवनाबद्दल माहिती |Alfred Nobel biography--

     नमस्कार मित्रांनो आज आपण नोबेल पुरस्काराचे जनक अल्फ्रेड नोबेल (Alfred Nobel) यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत. अल्फ्रेड नोबेल यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय गूढ असे होते. ते अतिशय साधे, विरक्त व तपोनिष्ठ आयुष्य जगले. त्यांनी मिळविलेल्या अमाप संपत्तीतूनच जगातील लोकप्रिय आणि प्रतिष्ठित 'नोबेल' पुरस्काराचा जन्म झाला. त्यांनी आपली सर्व संपत्ती मानवीकल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून जगात असे काम करण्याची प्रेरणा सतत निर्माण होत राहावी यासाठी वापरली. सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या जागतिक दर्जाच्या संशोधकांचा, साहित्यिकांचा आणि शांततेसाठी काम करणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी आपल्या संपत्तीचा उपयोग व्हावा, अशी शेवटची इच्छा बाळगणारे अल्फ्रेड नोबेल जगभरात अजरामर झाले.

            नोबेल पुरस्काराचे जनक अल्फ्रेड नोबेल--

     अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म 21 ऑक्टोबर, 1833 रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झाला. ते रसायनशास्त्रज्ञ, इंजिनिअर आणि उत्पादक होते. त्यांनी डायनामाइट आणि इतर शक्तिशाली स्फोटकांचे शोध लावले आणि नोबेल फाउंडेशनची स्थापना केली. जगात अतिशय प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या, शांततेसाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी केलेल्या संशोधनाला दिल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्काराची सुरुवात केली. त्यांची आई कॅरोलीना आणि वडील इमॅन्युएल हेदेखील संशोधक आणि अभियंता होते.

     लहानपणी अल्फ्रेड सतत आजारी पडत असत; परंतु आईचे अल्फ्रेडवर अतिशय प्रेम होते. तो लहानपणापासूनच अतिशय हुशार, चिकित्सक होता. त्याला स्फोटकांबद्दल खूपच आकर्षण होते आणि अभियांत्रिकीचे ज्ञान त्याने आपल्या वडिलांकडूनच मिळविले होते. सुरुवातीला अनेक व्यवसायांमधून झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे इमॅन्युएल यांनी 1837 साली रशियातील पीट्सबर्ग येथे स्थलांतर केले.

     तेथे मात्र खाणीतील स्फोट आणि त्यासंबंधीच्या हत्यारांच्या उत्पादनात त्यांनी प्रचंड यश मिळविले. त्यांनी अल्फ्रेडला उत्तम शिक्षण दिले. अल्फ्रेडलाही अभ्यासात आणि शास्त्रीय प्रयोगात विशेष रस होता. वयाच्या 16 व्या वर्षीच तो एक कार्यक्षम केमिस्ट बनला. त्याचबरोबर इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आणि रशियन या भाषांवरही त्यांनी प्रभुत्व मिळविले. स्वीडिश तर त्यांची मातृभाषाच होती.

     1850 साली त्यांनी रशिया सोडले. एक वर्ष पॅरिसमध्ये राहून त्यांनी रसायनशास्त्राचा अभ्यास केला. नंतर अमेरिकेत जाऊन त्यांनी जॉन एरिक्सन या सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मार्गदर्शनाखाली काम केले. त्यानंतर परत त्यांनी आपल्या आई-वडिलांबरोबर सैनिकी अवजारे बनविण्याच्या कारखान्यात काम करायला सुरुवात केली. युद्धानंतर पुन्हा एकदा व्यवसाय दिवाळखोरीमुळे बंद करावा लागला आणि हे कुटुंब मायदेशी परतले. मायदेशी आल्यावर अल्फ्रेड यांनी आपले स्फोटकांचे संशोधन सुरूच ठेवले. 1863 साली त्यांनी 'डिटोनेटरचा' शोध लावला, तर 1865 साली 'ब्लास्टिंग कॅप' विकसित केली. एका स्फोटात त्यांना आपला भाऊ गमवावा लागला. तरीही धैर्याने त्यांनी आपले संशोधन पुढे चालूच ठेवले. ते आपल्या उत्पादन विभागाचा विस्तारही करीत राहिले.

     1867 साली त्यांना अपघातानेच 'नायट्रोग्लिसरिन' आणि 'किसेलगर' यांच्या संयोगाने एका महत्त्वाच्या नवीन रसायनाचा शोध लागला. या पदार्थाचे नामकरण त्यांनी 'डायनामाइट' (फ्रेंच भाषेत पावडरला डायनामाइट असे म्हणतात) असे केले. या पदार्थाचे त्यांनी अमेरिका आणि ब्रिटनकडून पेटंटही मिळवले. या शोधामुळे अल्फ्रेड नोबेल जगप्रसिद्ध झाले. डायनामाइटचा उपयोग बोगदे खणण्यासाठी, पाट तयार करण्यासाठी, रेल्वे रूळ तयार करण्यासाठी संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात होऊ लागला. डायनामाइटच्या उत्पादनाचे आणि विक्रीचे प्रचंड मोठे जाळे त्यांनी 1870 ते 1880 या काळात जगभर सर्वत्र पसरवले.

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ज्ञानशाळा.कॉम)
                       ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.12.2023-रविवार.
========================================