दिन-विशेष-लेख-अल्फ्रेड नोबेल दिवस-E

Started by Atul Kaviraje, December 10, 2023, 10:13:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                                  "अल्फ्रेड नोबेल दिवस"
                                 ---------------------
                                                   
मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-10.12.2023-रविवार आहे. १० डिसेंबर, हा दिवस "अल्फ्रेड नोबेल दिवस" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     आपले संशोधन त्यांनी यापुढेही सतत चालूच ठेवले. त्यातूनच 1887 साली 'बॅलिस्टाइट' या शक्तिशाली आणि सोईस्कर स्फोटकाचा शोध लागला. याच काळात त्यांच्या भावानेही तेलक्षेत्रातून प्रचंड संपत्ती गोळा केली होती. स्वतःचे संशोधन, उत्पादन आणि कंपन्यांमधील गुंतवणूक यांच्या साहाय्याने ते प्रचंड संपत्तीचे मालक झाले. 1893 साली त्यांनी स्वीडनमधील सैनिकी अवजारे, शस्त्रास्त्रे यांच्या उत्पादनात रस घ्यायला सुरुवात केली. त्यातूनच जगप्रसिद्ध 'बोफोर्स' उत्पादनाची निर्मिती सुरू झाली. स्फोटकांबरोबरच अल्फ्रेड यांनी सिल्क, इत्यादींसारखे बरेच शोध लावले. वेगवेगळ्या देशांत त्यांच्या नावाने सुमारे 355 पेटंट्स आहेत.

             नोबेल पुरस्काराचा जन्म--

     1895 साली त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि 10 डिसेंबर, 1896 रोजी मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्फोटके आणि दारूगोळा तयार करणाऱ्या 90 कारखान्यांचे जाळे जगभर पसरले होते. अल्फ्रेड नोबेल यांनी 27 नोव्हेंबर रोजी पॅरिस येथे आपल्या मृत्यूनंतरचे त्यांचे इच्छापत्र तयार करून स्टॉकहोमच्या बँकेत ठेवले होते. ते त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रांना, आणि सर्वसामान्य जनतेलाही अतिशय आश्चर्यकारक ठरले.

     आपल्या सर्व संपत्तीचा विनियोग एका ट्रस्टद्वारे मानवीकल्याण करणाऱ्या संशोधकांचा, साहित्यिकांचा आणि शांततेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी करावा अशी त्यांची शेवटची इच्छा होती. यावरून ते लोककल्याणाच्या बाबतीत अतिशय उदारमतवादी होते हे स्पष्ट झाले. अल्फ्रेड नोबेल यांनी मागे ठेवलेल्या अमाप संपत्तीतूनच जगातील सर्वांत लोकप्रिय आणि सन्मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'नोबेल' पुरस्काराचा जन्म झाला.

     अल्फ्रेड नोबेल अतिशय विसंगत आणि विरोधाभास असणारे गूढ व्यक्तिमत्त्व होते. अत्यंत विलक्षण बुद्धिमत्ता; परंतु एकटेपण असलेले, अर्धवट निराशावादी तरीही कल्पक व ध्येयवादी व्यक्तिमत्त्व होते. ज्यांनी आधुनिक युद्धात वापरली गेलेली अतिशय शक्तिशाली स्फोटके निर्माण केली आणि त्याचबरोबर त्यातून मिळालेली सर्व संपत्ती मानवीकल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून जगात असे काम करण्याची प्रेरणा सतत निर्माण होत राहावी यासाठी वापरली.

     अशा जागतिक कीर्तीच्या सन्मानाचेही ते जनक ठरले. मृत्युपत्रातील काही तांत्रिक अडचणींमुळे पहिले नोबेल पारितोषिक देण्यास 1901 साल उजाडले. एकीकडे शक्तिशाली स्फोटकांचा निर्माता आणि दुसरीकडे नोबेल पुरस्काराचा जनक हे समीकरण विसंगत वाटण्याजोगे असले तरीही आपण स्वबळावर मिळविलेली संपत्ती जनहितार्थ काम करणाऱ्यांचा बहुमान करण्यासाठी वापरणे हे एक विलक्षण औदार्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ज्ञानशाळा.कॉम)
                       ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.12.2023-रविवार.
========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
========================================