१४-डिसेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, December 14, 2023, 10:38:54 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.१२.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                "१४-डिसेंबर-दिनविशेष"
                               ----------------------

-: दिनविशेष :-
१४ डिसेंबर
राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन
========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९४
थ्री गॉर्जेस धरण
चीनमधील यांगत्से नदीवरच्या महाप्रचंड अशा 'थ्री गॉर्जेस' धरणाच्या बांधकामास सुरुवात झाली. १ जून २००३ रोजी या धरणात पहिल्यांदाच पाणी साठवण्यास सुरुवात झाली आणि डिसेंबर २०१५ मध्ये धरण बांधून पूर्ण झाले. या धरणाने पर्यावरण विषयक तसेच विस्थापितांच्या अनेक समस्या निर्माण केल्या आहेत.
१९६१
टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९४१
दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.
१९३८
गोपालकृष्ण
गोपालकृष्ण (१९३८)
'प्रभात'चा 'गोपालकृष्ण' हा मूकपट मुंबईच्या 'मॅजेस्टिक' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. याच चित्रपटावर बेतलेला 'प्रभात'चा बोलपट १९३८ साली प्रदर्शित झाला.१९०३
किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी विमान उड्डाणाचा पहिला प्रयत्‍न केला.
१८१९
अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.
========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९५३
विजय अमृतराज
विजय अमृतराज – भारतीय लॉनटेनिसपटू
१९४६
संजय गांधी
इंदिरा गांधी यांच्यासमवेत
संजय गांधी – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र
(मृत्यू: २३ जून १९८०)
१९३९
सतीश दुभाषी
सतीश दुभाषी – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते
(मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)
१९३४
श्याम बेनेगल
श्याम बेनेगल – चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक, राज्यसभा खासदार (२००६ - २०१२), पद्मश्री (१९७६), पद्मभूषण (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (२००५), १८ वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९२८
प्रसाद सावकार – गायक व नट
१९२४
राज कपूर – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आणि 'द ग्रेटेस्ट शो मॅन'
(मृत्यू: २ जून १९८८)
१९१८
योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार – जागतिक कीर्तीचे थोर तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांना त्यांनी योगविद्येचे पाठ दिले. 'Light on Yoga' हा त्यांचा ग्रंथ जगात 'योगविद्येचे बायबल' समजला जातो.
१८९५
जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: ६ फेब्रुवारी १९५२)
१५४६
टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले.
(म्रुत्यू: २४ आक्टोबर १६०१)
१५०३
नोट्रे डॅम (Nostradamus) – प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता (म्रुत्यू: २ जुलै १५६६)
========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९७७
ग. दि. माडगूळकर
गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते आणि वक्ते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १५७ पटकथा आणि २००० हुन अधिक गीते लिहिली आहेत. गीतरामायणामुळे त्यांना 'महाराष्ट्राचे वाल्मिकी' म्हणून ओळखले जाते. संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९५१), पद्मश्री (१९६९)
(जन्म: १ आक्टोबर १९१९)
१९६६
शैलेन्द्र
शंकरदास केसरीलाल ऊर्फ 'शैलेन्द्र' – गीतकार
(जन्म: ३० ऑगस्ट १९२३ - रावळपिंडी, पंजाब, पाकिस्तान)
१७९९
जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २२ फेब्रुवारी १७३२)
========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.12.2023-गुरुवार. 
========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
========================================