पाणीपुरी

Started by शिवाजी सांगळे, December 28, 2023, 03:18:18 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पाणीपुरी

"मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे"
ठाव मजला आवडे तुज पाणीपुरी खाणे

जाता पुरी मुखात, मुखी दाह का व्हावा
मिटताच ओठ, आस्वाद खरा समजावा
व्यर्थ ठरते येथे दूसरे काही विचारणे...

हाती पुरी गोल ज्याच्या त्याने का थांबावे
ज्याने न चाखली कधी, त्या कसे उमजावे
फस्त करीत पुऱ्या, ते समाधिस्त होणे...

दिसता कधी समोरी तो रंगबिरंगी ठेला
लगेच सुटे मुखी पाणी न् येतसे तजेला
मनी एक विचार फक्त पाणीपुरी खाणे...
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९