अरे त्या आरक्षणाच झालं तरी काय?

Started by Rushi.VilasRao, December 29, 2023, 12:33:40 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

चर्चा खूप चालू आहे बाबा त्याझी....
कोणाची रे?
अरे त्या आरक्षणाची...
अरे हो खरंच की...
अरे त्या आरक्षणाच झालं तरी काय ?
खेड्यात, जंगलात राहणाऱ्या "आदिवासी पर्यंत" पोहोचलं काय....?
चार बाय चार च्या एका कोपऱ्यात बसून लोकांच्या चप्पला शिवणाऱ्या "चांभारा पर्यंत" पोहोचलं काय....?
पोटापाण्या साठी बायका पोर घेवून रस्त्यावर दोरीचा खेळ करत फिरणाऱ्या "डोंबाऱ्या पर्यंत" पोहोचलं काय....?
७-८ महिने रहात घर परिवार सोडून गाओ गाव फिरणाऱ्या मेंढ्या फिरवणाऱ्या "धनगरा पर्यंत" पोहोचलं काय....?
आख्या भारतात ज्यांचा सात-बारा स्वतः च घर दार न्हाई अन् चोऱ्या माऱ्या करून लोकांची चाकरी करून जगणाऱ्या "उचल्या पर्यंत" पोहोचलं काय....?
मेलेली गुर ढोर उचलणाऱ्या, त्याझच मास मटण खाणाऱ्या, गावांनी ज्यांच्या पाऊलखुणा सुद्धा नाकारल्या त्या "महारा पर्यंत" पोहोचलं काय...?
ज्यांच्या बायकांना चोळ्या घालायची मुभा नाही अन् दगड धोंडे फोडत गाव गाव फिरण्या वाचून पर्याय नाही अशा "वडारा पर्यंत" पोहोचलं काय....?
जिथं बांध तिथं घर म्हणत मरीआई लक्ष्मिआई डोक्यावर घेवून पोटाला कोरभर तुकडा मिळावा म्हणून फिरणाऱ्या "जोगत्यां पर्यंत" पोहोचलं काय....?
ज्याला नचवला समाजाने तालावर तो नचवतो माकड अन् साप हाताच्या इशाऱ्यावर अशा "गारूड्या पर्यंत" पोहोचलं काय....?
लोकांची गु-घान साफ करन ज्यांच्या वर लादल गेलं त्या "भांगी लोकांपर्यंत" पोहोचल काय....?
 राहायला ज्यांना घर नाही.... बलुत्या वर ज्यांच जगणं त्या "घिसाडी पर्यंत" पोहोचलं काय....?
 खायला घरात आन नाही पण लोकांच्या घरातल्या भाकरी साठी डालगी टोपली बनवणाऱ्या हालगी वाजव्या "मांगा पर्यंत" पोहचलं काय....?
घालायला स्वतः चा कपडा नाही उसण्या कापडाच्या झोळीत दान मागत फिरणाऱ्या "फकीर पर्यंत" पोहचलं काय....?
 स्वतः ला कसायला शेत नाही पण गळक्या झोपडीच्या कडला आगीची झळ सोसत दुसऱ्या साठी कुदळ खुरप घडवणाऱ्या "लव्हारा पर्यंत" पोहचलं काय....?
सुळसुळाट झाला डुकरांचा की पकडायला बोलावण्यात आलेल्या अन् त्याच पकडलेल्या डूकरा वर पोट भरणाऱ्या "कैकाड्यां पर्यंत" पोहोचलं काय...?
समाजाने नेहेमीच नाकारलेला उघड्यावर सदा संसार त्याझा जंगलात शिकारीवर चा हौशी मारून खावा लागतो पक्षी, अशा "परद्या पर्यंत" पोहोचलं काय....?

यादीत असे अजून किती तरी आहेत भटके...
अजून किती तरी बाकी आहेत विमुक्त....
यांचा प्रश्न मिटवायला कोण तयार नाही....
अन् दुसरे म्हणायला लागलेत आम्हाला पण द्या....
आम्हाला नाही तर कोणाला नाही....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)