जर तर ची गोष्ट

Started by mkapale, January 15, 2024, 08:35:46 AM

Previous topic - Next topic

mkapale

जर तर ची गोष्ट

कानी गुणगुणत होता कोणी
स्वप्न बनले त्या सुरातूनी
शब्द दिले असते डासांना
तर निरोप गेले असते हवेतूनी

सखीला मागणी घातली असती
जिवंत आला तर होकार, अथवा शिकार
आईची कुणकुण असती वसतिगृहात
"उठ" म्हणून डास झाला असता पसार

डोळे कॅमेरा असते तर छोटे ड्रोन्स
रात्री गुन्हे शोधत फिरले असते
चोरांना चावून चावून हैराण करत
समाज विघातक साफ केले असते

गुणगुण करत तो म्हणाला, तुझे
रक्त आहे माझ्यात म्हणून काय
तुझी स्वप्न पण आता लादशील का
त्यांची जबाबदारी आपण घेत न्हाय

जर तर ती गोष्ट हेच सांगून गेली
शेवटी रक्ताची नाती कितीही खरी
आपली स्वप्न आपणच उभी करायची
इतर साक्ष , स्वतः कंबर कसलेली बरी