तडका - कमळाबाईचा वास

Started by vishal maske, February 10, 2024, 06:33:52 AM

Previous topic - Next topic

vishal maske

कमळाबाईचा वास

पुतण्या सांगे काका ला
बस करा आता वय झालं
अजुन कुठवर संभाळता
तुमचं नेतृत्व लय झालं

नेतृत्व मलाही जमु शकतं
ही गोष्ट एवढी बडी़ नाही
तुमची वेळ निघून गेली
आता ही तुमची घडी नाही

काकांच्या घडीतील वेळेवरच
पुतण्या ने गल्ला भरला होता
आता मात्र काका च्या घडी वर
पुतण्या ने डल्ला मारला होता

जरी चिन्ह आणि नावही गेलं
काका मात्र अजुन उभे आहेत
पण दोघांच्याही मनात आता
स्वहिताचेच मनसुबे आहेत

तसं पहायला गेलं तर बघा
पुतण्या काकाच्या छत्रीत आहे
महाराष्ट्र हे जाणतो आहे की
कोण कुणाच्या कात्रीत आहे

कधी मनात पाल चुकचुकते
ही लढाई एक भास आहे
काका-पुतण्याच्या लढाईला
कमळाबाईचा वास आहे, ?

ॲड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड
मो. ९७३०५७३७८३