हशील

Started by शिवाजी सांगळे, May 22, 2024, 08:48:24 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

हशील

बरंच काही हरवलंय काळाच्या ओघात...
किती छान होत नाही का नातं लोकात!

खुप काही घडायचं, तरीही पडत नव्हत
तेव्हा, उगाचच कुणी कुणाच्या मध्यात.!

लोकांना वेळ अन् रहाणी साधीच होती
पगार कमी होता, पण रहायचे झोकात!

ठिक आहे, वेळ सरली, काळ बदलला
दिसत नाही पुर्वीचा, एकोपा जगण्यात!

तंत्रज्ञान बदलले, विचार सुद्धा बदलले
हशील आहे का काही विरोध करण्यात?

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९