का वाटतं?

Started by शिवाजी सांगळे, June 19, 2024, 09:51:42 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

का वाटतं?

सारचं जणू व्यर्थ आहे....का वाटतं ?
पाहून दु:ख, डोळा पाणी का दाटतं ?

अत्याचार न् हत्या त्वेषात अबलेची
मानसिकताच बिघडली असं वाटतं !

ठेवावा कुठे भरवसा, जगताना इथे
राज्यकर्ते, आंधळे झालेत हे वाटतं ?

विधिनिषेध वागण्याचा न दिसे कुठे
संस्कार पडतात कमी असंच वाटतं !

पिढी जुनी नवी भेदभाव नाही मुळी
तऱ्हाच वागण्याची बिघडली वाटतं !

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९