पावसाळी सोबत

Started by mkapale, July 31, 2024, 01:06:30 PM

Previous topic - Next topic

mkapale

पावसाळी सोबत

रुक्ष उन्हाळ्यापरि कोरडे
वाटे आयुष्य कंटाळवाणे खरे
पावसासारखा चिंब विसावा
मित्र सोबत घेऊनि येती

भेटतसे गुणवंतांची टोळी
काही आगळे वेगळे न घडे जरी
बालमित्रांसोबत वेळ जो दवडी
बाळ मनातले शोधून काढती

निसर्गापरी मित्रांच्या छटा अनेक
कोणी झरा , कोणी तलाव शांत
कोणी पर्वतापरी, कोणी लता नाजूक
रंगीत फुलांगत काही असती

एकत्र येता मन बेधुंद
हसण्याचा प्रवाह बेबंद
एकत्र कोणतीही क्रिया करत
मने कारंज्यागत फुलती

भेटावे मित्रांना जरूर काही वेळ
चित्र न पाहावे दुरून केवळ
ओलावा सोबतीचा साठवत
आठवणी कई दिन पाझरती