धर्मनिरपेक्ष आहे का देश माझा

Started by Rushi.VilasRao, September 01, 2024, 06:38:09 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

रोज होतात जाती जातीत भांडणे इथं
रोज होतात धर्म धर्मात कलह इथं
रोज होणारे धार्मिक कलह पाहून
रोज अनुत्तरित प्रश्न पडतो मनाला इथं
खरंच धर्मनिरपेक्ष आहे का देश माझा?
रोज फोडली जातात माथी इथं,
रोज जाळल्या जातात वस्त्या,
वातावरण निवळता निवळत नाही तोवर मयताच्या टाळू वरच लोणी खायला येतात नाममात्र बड्या हस्त्या,
रोज अनुत्तरित प्रश्न पडतो मनाला
खरंच धर्मनिरपेक्ष आहे का देश माझा?
Writer:- writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
गीता अन् कुराण कधी भांडताना दिसले नाहीत
ना दिसले कधी भांडताना बाइबल अन् गुरु ग्रंथ साहिब
या धर्मांच्या पुस्तकांचा हवाला देणारे मात्र चौकात भांडताना दिसत राहतात
रोज अनुत्तरित प्रश्न पडतो मनाला
खरंच धर्मनिरपेक्ष आहे का देश माझा ?
कोणी म्हणतो माझा राम आहे श्रेष्ठ,
कोण म्हणतो मेरा रहमान है प्यारा,
कोण म्हणतो एशू एकमेव सत्य,
यात जगाला शांतीचा संदेश देणारा बुद्ध मात्र हरवून गेला,
रोज अनुत्तरित प्रश्न पडतो मनाला
खरंच धर्मनिरपेक्ष आहे का देश माझा?
कमी झालाय विनाकारण दरवळने देशभक्तीचा सुगंध इथे
त्याला कारण लागत एखाद्या तारखेच, नुसती तारीख असून चालत नाही त्याला निमित्त लागत आपल्या जातीच्या समाजसुधारकाच

Writer:- writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan