इथे अंधाराचे खेळे

Started by शिवाजी सांगळे, September 02, 2024, 10:38:09 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

इथे अंधाराचे खेळे

इथे अंधाराचे खेळे, सारे स्तब्ध होती व्यवहार
गल्ली बोळातून होई, यंत्रणेचा उध्दार उध्दार

कामे जाती हो थांबून, राहते जनता अडून
होता सुन्न भोवताल, मनी शिव्यांचेच थैमान
नको नको त्या शंकानी, उठते काहूर काहूर

वारा पाऊस थोडा येता, विज लगेच कापती
देत तीच जुनी कारणे, फोन देखील तोडती
संतापाने फुटे अंगी, घामाची नवी धार धार

घालवून नेहमी विज, येते वाढीव नवे बिल
करा निट हिशोब त्याचा, यां कोण हो सांगेल
हा कायम इकडे होतो, अजब प्रकार प्रकार

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९