*** तुझी भेट ***

Started by धनराज होवाळ, September 02, 2024, 05:30:28 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


*तुझी भेट...*

आज तुझ्या अविस्मरणीय भेटीत,
अनमोल क्षणाची अभिलाषा होती..
तुझ्या त्या टपोऱ्‍या डोळ्यात,
खरंच एक वेगळीच नशा होती..!!

हृदय मिठीसाठी हावरी झाली होती,
तु लाजून थोडी बावरी झाली होती..
जवळ असून सुद्धा भेटता येत नव्हतं,
जनू अमावसेला चंद्राला पेटता येत नव्हतं..!!

तुझा तो झालेला पहिला स्पर्श,
अंगावर शहारे आणणारा होता..
डोळ्यांच्या त्या पहिल्याच भेटीत,
हासू अन् आसवांचा किनारा होता..!!

बोलायचं तर खूप काही होतं,
पण तेव्हा बोलताच येत नव्हतं..
हातांची झालेली ती घट्ट मिठी,
दुरावताना हात सोडताच येत नव्हतं..!!

मग तु गेलीस लगेच सोडून मला,
पुन्हा भेटण्याचे एक वचन देऊन...
जाता जाता आपल्या प्रेमाचे,
हृदयात गेलीस एक मोरपीस ठेऊन...!!!

कवी धनराज होवाळ
मो. ९९७०६७९९४९.