विसर्जन गणपती बाप्पाचे

Started by Atul Kaviraje, September 18, 2024, 11:13:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

डोळे भरून तुझे दर्शन घेतोय
तुझे मंगल रूप अंतःकरणात साठवतोय
आज तुझे विसर्जन आहे बाप्पा,
अश्रुपूर्ण नयनांनी तुज निरोप देतोय.

जळ आहे समुद्राचे आज शांत
तुझ्या येण्याची वाट पाहतोय निवांत
अतूट नाते तुझे आणि सागराचे,
सामावून घेतोय सहस्त्रकरांनी तुला आपल्यात.

सायंकाळची छाया लागली आहे पसरू
किलबिलाट थांबलाय,  शांत आहे पाखरू
मंद वारा वाहून आणतोय गारवा,
दिशाही आता लागल्यात चारीबाजुंनी अंधारु.

बाप्पा माझ्या मनात वसला होतास
उत्साह, चैतन्य प्रदान करीत होतास
छान होते दिवस तुझ्या उत्सवाचे,
मांगल्याचे, खुषीचे, आनंदाचे, उधाणाचे, उत्साहाचे.

तुझ्या विसर्जनाची वेळ जवळ आलीय
तुझ्या मूर्तीपुढे भक्तिभावे आरती ओवाळलीय
पणतीच्या प्रकाशात रूप सुंदर दिसतंय,
गहिवरल्या मनास ते सांत्वना देतंय.

मखरातले स्थान तुझे रिक्त होणार
तुझी पोकळी भरून नाही निघणार
तुझी पाठवणी जरी मी करतोय,
तरी उदास मनास कोण समजावणार  ?

गहिवरल्या कंठाने तुज निरोप देतोय
सागर तुला आपल्या कवेत घेतोय
विसर्जन मनाला चटका लावून जाते,
तुझी मूर्ती पाण्यात दिसेनाशी होते.

माहीताहे तू पुढल्या वर्षी येणार
उत्साहाने, चैतन्याने माझे घर भरणार
वाट पाहीन, वर्षभर मी थांबेन,
तुझ्या स्वागताची जोशपूर्ण तयारी करणार.

--अतुल परब
--दिनांक-18.09.2024-बुधवार.
===========================================