विसर्जन गणपती बाप्पाचे

Started by Atul Kaviraje, September 19, 2024, 03:10:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
आरती ओवाळूया, प्रसाद मोदकांचा अर्पूया
साष्टांग प्रणिपात, चरणी माथा टेकवूया,
सर्वांनी मिळून गणेशाचे गुणगान गाऊया.

होतास तू आमच्यासवे थोड्याच दिवसांसाठी
परि आहेस मनात अनंत काळासाठी
आमच्या कुटुंबाचाच तू भाग होतास,
निशिदिनी तू सतत आमच्यासवे होतास.

तू आलास, आम्हाला आनंद झाला
बाप्पा तू सर्वस्वी आमचाच झालास
घरात चैतन्याचा झरा भरभरून वाहीला,
आनंद, उत्साह, आपलेपणा अनुभवास आला.

माझ्या आनंदाला पारावारच नाही राहीला
नित्य होते मनोभावे तुझ्या सेवेला
दैवत तू आहेस माझे आवडते,
अग्रहक्क मिळाला मला तुझ्या पूजनाला.

तू वर्षभर का नाहीस रहात ?
तू आहेसच नित्य माझ्या मनात
जसा विसर्जनाचा दिन येतोय निकट,
तुला निरोप द्यावासाच नाही वाटत.

उदास मन, डोळा येतंय पाणी
येताहेत बाप्पा तुझ्या मंगल आठवणी
तुझी आता वर्षभर भासेल उणीव,
तुझ्या अभावाची वारंवार होईल जाणीव.

बाप्पा आज मी नाही रडणार
तुला हसून मी निरोप देणार
पुढल्या वर्षी पुन्हा ये लवकर,
उत्साहाने पुन्हा भरून येईल घर. 

--अतुल परब
--दिनांक-19.09.2024-गुरुवार.
===========================================