देऊळ आणि त्याचा कळस

Started by Atul Kaviraje, September 24, 2024, 07:46:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, आज वाचूया देऊळ आणि त्याच्या कळसावर एक चिंतनीय कविता--

माथा कळसाचा गगनास जाऊन भिडला
अथांग आभाळाशी हितगुज करू लागला
मान उंचावीत पताका राऊळाची फडकली,
निराकार ईश्वराच्या चरणांसी नमीत झाली.

पूर्ण चंद्रप्रकाशात शिखर उठून दिसते
लाल दगडाला अतीव शोभा येते
घरंगळत जातो प्रकाश चंद्राचा अंगभर,
लखलखत राहतो लाल घडणीचा पत्थर.

चंद्र कळसाची युती पायथा पहातो
विलक्षण दृश्य पाहुनी हरखून जातो
स्थान पायथ्याचे म्हणून काय झाले ?
शिखर तर आभाळास जाऊन पोचले.

रात्र झुकलीय माथ्यावर, निरव शांतता
एकलाच शोभतोय, चमकतोय कळसाचा माथा
जग झोपले, नाहीय जागे कुणी,
कळस सांगू इच्छितो आपली कहाणी.

शतकानुशतके उभा अचल, स्थिर, खंबीर
उंचावरून पहात, उघडे नेहमीच द्वार
आहे चिरंतन, टिकवीत राहील अस्तित्त्व,
गाभाऱ्यातील ईश्वराने बहाल केलंय देवत्त्व.

राऊळाच्या कळसास नाही गर्व, अहंकार
भक्त आधी झुकतो, करीतो नमस्कार
शिकावी साऱ्यांस, ताठ मानेने जगावे,
होऊन  लहान, यशाचे शिखर गाठावे.   

--अतुल परब
--दिनांक-24.09.2024-मंगळवार.           
============================================