तीन जिवलग मैत्रिणी

Started by Atul Kaviraje, September 25, 2024, 08:42:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, या तीन जिवलग मैत्रिणी आपल्याला काय सांगताहेत ते ऐकुया--

वाटतोय जरी आम्ही बहिणी एकमेकांच्या
तरी आहोत मैत्रिणी सख्ख्या जिवाभावाच्या
बालपणापासूनची आहे ही मैत्री आमची,
निश्चय केलाय ती शेवटपर्यंत टिकवण्याची.

एकाच शाळेत शिकलो आम्ही तिघी
एकाच बाकावर बाजूबाजूला बसलो तिघी
शाळेपासून प्रसिद्ध आहे आमची मैत्री,
एकचं शिक्षण घेतोय आम्ही कॉलेजातही. 

एकाच थाळीत आम्ही जेवतो रोज
एकमेकांशिवाय चैनच पडत नाही आम्हाला
पहा फोटोमध्येही आहोत आम्ही एकत्र,
आश्चर्य वाटतंय ना याचं तुम्हाला.

आमची आवड एक,  निवड एक
आम्ही आहोत जणू एकमेकांशी एकरूप
अटळ, अखंड, अतूट आमची मैत्री,
एकमेकांवर आहे आमचे प्रेम खूप.

सुसंस्कृत, चांगल्या खानदानात आम्ही वाढलो
सौंदर्याचा वारसा घेऊनच जन्माला आलो
आमच्याकडे पाहून खात्री पटतेय ना,
साधेसुधे रूप तुम्हाला आवडतेय ना.

रविवार आहे, कॉलेजला आहे सुट्टी
पहा आमची जमलीय कशी गट्टी
निघालोय फिरायला, सुंदर पोशाख घालुनी,
अन मोजकाच, नीटनेटका मेकअप करुनी.

निसर्गात फिरायला आम्हाला आवडते खूप
तिथेच तर खुलतेय आमचे रूप
मन आनंदी होते, प्रसन्न होते,
निसर्गातच एकतानता लागते, समाधान मिळते.

वयच आमचे मुक्त, स्वैर भटकण्याचे
हसण्याचे, झुलण्याचे, बागडण्याचे, खेळण्याचे, विहरण्याचे
फुल होऊन बागेत सुंदर फुलण्याचे,
दिशदिशांत रूपाचा सुगंध पखरीत राहण्याचे.

आम्हाला नेहमीच एकमेकांसोबत छान वाटतं
हातात हात घालून फिरायला आवडतं
हेवा नका करु आमचा तुम्ही,
दृष्ट नका लावू मैत्रीला तुम्ही.

आम्ही अश्याच आहोत, अश्याच राहणार
आम्ही जिवलग मैत्रिणी, एकमेकांसोबत राहणार
एकमेकींच्या सुख-दुःखात नेहमीच सहभागी होणार,
हसणार, रडणार, एकमेकींचे अश्रू पुसणार.

उन्हे उतरलीत, लागतेय चाहूल संध्याकाळची
घाई लागलीय आम्हा तिघींना परतण्याची
दिवस सुंदर गेला एकमेकींच्या सहवासात,
निघालोय घरी आनंदात गाणे गात.

--अतुल परब
--दिनांक-25.09.2024-बुधवार.
===========================================