युवतीचे मनोगत

Started by Atul Kaviraje, September 26, 2024, 08:49:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, थोडं थांबूया आणि ऐकुया ही युवती काय म्हणतेय ते--

नुकताच उरकलाय समारंभ आजच्या दिवसाचा
छान झाला कार्यक्रम आजच्या समारंभाचा
भरून वाहत होता साऱ्यांच्या उपस्थितीने,
गजबजला होता अंतर-बाह्य भाग मंडपाचा.

आता तिथे नाहीय कुणी चिटपाखरू
सकाळपासून उत्सव होता तिथे आनंदाचा
उत्साह प्रवाहत होता साऱ्या मंडपभर,
साऱ्यांच्याच खुशीला आला होता भर.

सर्व आनंद आता गेलाय ओसरून
गेलाय प्रत्येकजण मंडपास रिते करून
तुझ्याशिवाय तिथे नाही कुणीही आता,
मंडप सारा भरलेला तेव्हा होता.

कळेना, एकटीच अजुनी का राहिलीस
याबद्दल कारणे काहीच नाही दिलीस
संभ्रमित मी तुझ्याचकडे होतो पहात,
अन हळूहळू पडत होतो बुचकळ्यात.

माझ्या नजरेचा रोख तिला उमगला
नजरेतला प्रश्नार्थक भाव तिला कळला
म्हणाली, आवडतं मला एकटीला राहायला,
तशी नाही भीत मी गर्दीला.

कारणंच तसं होतं माझं थांबण्याचं
फोटो सेशन मला होतं करायचं
माझे फोटो नेहमीच काढत असते,
फावल्या वेळांत पुन्हा-पुन्हा पहात असते.

माझ्या सजण्यावरून तुम्हाला कळून चुकलंय
माझ्या नटण्यावरून तुम्हाला समजून आलंय
हेच आहे माझे निमित्त रेंगाळण्याचे,
हेच आहे कारण माझ्या घुटमळण्याचे.

नवीनच घातलाय पोशाख या क्षणांसाठी
गुलाबी रंगात उजळून निघालीय देहयष्टी
चेन सोन्याची घातलीय मी गळा,
हलकासाच केलाय मी मेकअप सगळा.

आवडतं मला साधंच, नीटनेटकं राहायला
आनंदाचा प्रत्येक क्षण मनापासून उपभोगायला
प्रत्येक समारंभास नेहमीच लावते हजेरी,
निघून जाते मरगळ मनाची सारी.

नेहमीच आनंदी असते, हसत असते
नेहमीच समाधानी असते, खूष असते
आताही हसूनच पाहतेय मी तुमच्याकडे,
उभी आहे निर्धास्त मी तुमच्यापुढे.

चिक्कार फोटो काढलेत या निमित्ताने
भेट झाली तुमच्याशी या कारणाने
असेच आपण भेटत राहू समारंभात,
बोलत राहू, एकमेकांस प्रेमाने पहात.

मैत्री कराल का तुम्ही माझ्याशी ?
नाते जोडाल का तुम्ही माझ्याशी ?
कायम ठेवू स्मरणात भेट आजची,
ओढ आहे पुन्हा तुम्हाला पाहण्याची.

-अतुल परब
--दिनांक-26.09.2024-गुरुवार.
===========================================