सुंदर तरुणीचे कवितारूपी सौंदर्य वर्णन

Started by Atul Kaviraje, September 28, 2024, 09:59:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, आजच सकाळी अवचित भेटलेल्या आणि माझ्याकडे प्रेमाने पाहणाऱ्या त्या सुंदर तरुणीचे थोडक्यात कवितारूपी सौंदर्य वर्णन-

कारंज हास्याचे उडतंय
भिजवीत मनाचा कानाकोपरा
कुणाचीतरी आलीय आठवण,
थुईथुई नाचतोय मनमयूरा.

एवढी तू आनंदलीस
इतकी खूष झालीस
सांगायचं नाही वाटतं,
इतकी का हसलीस ?

गाली गुलाब फ़ुललेत
खुलून आलीय कळी
हवंय ना तुला,
कुणीतरी तुझ्या जवळी.

चेहराही तुझा हसतोय
नयनही तुझे हसताहेत
ओठ हलकेच विलगुनी,
हास्याची उधळण करताहेत.

नयनातून वाहतोय तुझ्या
प्रेमाचा निर्मळ झरा
कुणासाठी आहे बरं,
सांगशील का जरा.

आवडली सुंदर अदा
तुझी केसांना कुरवाळण्याची
हलकेच मानेने तिरपा,
हसून कटाक्ष टाकण्याची.

मखमली रेशमी केसांना
रुळू देत खांद्यांवरी
सौंदर्य तुझे खुलतंय,
माहित आहे कितीतरी.

साडी नसलीस रेशमी
सुंदर रंगाची जरतारी
चमचमत्या मण्यांची त्यावर,
सुबक काढलीय कशिदाकारी.

सोनेरी गळसरी गळ्यात
शोभिवंत घड्याळ हातात
साधासा साज ल्यालीस,
तरीही भरलीस मनात.

आता काहीतरी बोलशील
नुसतीच पहात राहशील
लाल ओठांच्या धनुकलीतून,
फक्त हसतच राहशील.

ऐकण्या आतुर मी
अडीच अक्षर प्रेमाचे
दोघांना एक करीत,
फुलुदे फुल प्रीतीचे.

--अतुल परब
--दिनांक-28.09.2024-शनिवार.
===========================================