"प्रेमाची चाहूल"

Started by स्वप्नील वायचळ, November 24, 2010, 04:10:22 PM

Previous topic - Next topic

स्वप्नील वायचळ

           "प्रेमाची चाहूल"
मन झाले ग उदास हवा तुझा सहवास
वेड्या माझ्या या मनाचा हा किती अट्टाहास
तुझ्याशिवाय ग माझा जणू आहे वनवास
तुझ्यासोबत हवा ग जीवनाचा हा प्रवास
येणाऱ्या सुखदुख्खात असू दे आपली साथ
तुझा हात विश्वासाने दे तू माझ्या ग हातात
आयुष्याच्या वाटेवरती मिळून टाकू ग पाउल
तुझ्या मनाला आहे का माझ्या प्रेमाची चाहुल ??
                            - स्वप्निल वायचळ