आला आला पाऊस आला

Started by स्वप्नील वायचळ, November 25, 2010, 02:21:44 PM

Previous topic - Next topic

स्वप्नील वायचळ

"आला आला पाऊस आला"

गडगडला तो मेघ काळा
आला आला पाऊस आला
सो सो सो सो सुटला वारा
मोत्यासारख्या पडती गारा

थेंबे थेंबे तळे साचे
तळ्यामध्ये मोर नाचे
झाडावरचा मुग्ध  कोकिळ
गाणे गातो आनंदाचे

नदी-सागराच्या लग्नात
टाकण्यास अक्षतांची वाळू
चिंब चिंब न्हालेली सृष्टी
परिधानते हिरवा शालू

जीवनात येते समृद्धी
धनधान्याची होते वृद्धी
सु-पिकती ताज्या फळभाज्या
आनंदी होतो बळीराजा

पावसाच्या आगमनाने
उल्हसित होते मन माझे
कडकड गडगड संगीतात या
मंत्रमुग्ध होऊनि मन नाचे

        -स्वप्नील वायचळ

Your comments boost our Confidence :)