मुलीचे कौतुक आणि सन्मान यावर कविता

Started by Atul Kaviraje, September 30, 2024, 11:13:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, एका स्वागत समारंभात मला भेटलेली एक मुलगी आणि तिचे इतक्या लहान वयात होणारे कौतुक आणि सन्मान यावर माझी एक कविता-

इतक्या लहान वयात नाव मिळवलेस
स्वतःच्या कर्तृत्त्वाने स्वतःस सिद्ध केलेस
यशाच्या शिखरावर अशीच चढत रहा,
आई वडिलांचे नाव रोशन केलेस.

आज तुझा आहे कार्यक्रम सन्मानाचा
अथक श्रमाने प्राप्त केलेल्या यशाचा
अहोरात्र खपलीस, निरंतर मेहनत घेतलीस,
दिवस आहे तुझ्या यशश्रीचा, विजयाचा.

आवड होती तुला बालपणापासूनच याची
पूर्तता होतेय आज तुझ्या स्वप्नांची
शिकण्याबरोबर तू यातही प्राविण्य मिळवलेस,
तुझ्या अंगाच्या कलागुणांनी नाव कमावलेस.

किती आनंदी आहेस, उतूच जातोय
इथला प्रत्येकजण आज तुलाच पहातोय
हास्य सुंदर फुलतेय, छान उमलतेय,
रुपाला तुझ्या मुली बहार आणतेय.

तू सहज साध्य केलंस सारं
त्यापाठी होते तुझे श्रम फार
नावारूपाला आलीस तू, किर्ती मिळवलीस,
सर्वांच्याच गळ्यातला ताईत तू झालीस.

बघ, मैत्रिणी आल्यात तुझ्या समारंभाला
आनंदाने, चांगल्या मनाने शुभेच्छा द्यायला
त्याही मोठ्या अभिमानाने मिरवतील आज,
त्यांच्या मैत्रिणीच्या डोक्यावर चढतोय ताज.

आईवडिलांना तर झालाय आनंद फारच
स्वप्नात आहेत, वाटत नाहीय खरंच
आपल्या मुलीने लहानपणीच यश मिळवले,
आपले नाव सर्वार्थाने सार्थक केले.

हॉल गच्च भरलाय प्रेक्षकांच्या उपस्थितीत
पाहुणेही लवकरच राहतील मंचावर उपस्थित
सन्मान होईल तुझा, बक्षीस मिळेल,
टाळ्यांच्या गजरात सारा हॉल दुमदुमेल.

तुला सजण्याची आवड आहे विशेष
त्यात आजचा दिवस खास आहेच
चमकदार चनिया चोळी शोभतेय तुला,
रंग तुझ्या देहावर खुलून आला.
 
समारंभासाठी छान सजलीस आज तू
घडीघडीचा कंठहार गळा चढविलास तू
कर्णफुले नक्षीदार शोभून दिसतात कानात,
फुलेच जणू उधळताहेत तुझ्या हास्यात.

राखलेस केस सुंदर, रुळताहेत खांद्यावरी
ओढणीचा शेव निळा रेशमी लहरी
बसण्याची तुझी अदा भावली मजला,
ऐटही आवडली, रुबाब त्यात दिसला. 

आहे तुला मोकळे विशाल आकाश
आणखीन नाव कमवायचेय, मिळवायचेय यश
तुझं मन आभाळात घेतंय भरारी,
स्वच्छंद उडतंय, पंख पसरून पक्ष्यांपरी.

मोठी हो, गवसणी घाल आकाशाला
उंच उंच झुलावा यशाचा झुला
तुझ्या पूर्ण होवोत मनीच्या इच्छा,
माझ्या आहेत तुला हृदयातून सदिच्छा.

--अतुल परब
--दिनांक-30.09.2024-सोमवार.
===========================================