"माणूस बनणे अवघड"

Started by स्वप्नील वायचळ, November 26, 2010, 03:24:06 PM

Previous topic - Next topic

स्वप्नील वायचळ

  "माणूस बनणे अवघड"
आपली तारीफ सगळेच करतात
दुसऱ्याची स्तुती करणे अवघड
दुसऱ्याची चूक सर्वांनाच दिसते
स्वतःची मान्य करणे अवघड

राजकारण्यांची निंदा सगळेच करतात
स्वतः नेता बनणे अवघड
"सोडला का नाही हा ball ?" सोपे असते
स्वतः सचिन बनणे अवघड

बडबड करणे सोपे असते
दुसऱ्याचे ऐकणे अवघड
यश मिळवणे सोपे असते
पण ते टिकवणे अवघड

हक्कांसाठी भांडणे सोपे असते
कर्तव्य पार पाडणे अवघड
प्रेमात पडणे सोपे असते
निभावून नेणे अवघड

संकल्प करणे सोपे असते
पूर्ण करणे अवघड
जन्माला येणे सोपे असते
माणूस बनणे अवघड
           -स्वप्नील वायचळ