मी अभिमानी

Started by बाळासाहेब तानवडे, November 26, 2010, 07:03:14 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे

मी अभिमानी
मला  मिळाली  खास  बुद्धिमत्ता.
माझी  सर्वांवर  चाले निरंकुश  सत्ता.
मला  वाटे  साऱ्या साल्यांचा दुसास.
कारण  मी   खास  ,मीच  आहे  खास.

जे  जे  उत्तम  ते  ते  मलाच  मिळेल.
प्रत्येकाचे  साल्याचे  घरदार  जळेल.
फक्त  माझ्याच  घरी  आहे  धन -धान्याची  रास.
कारण  मी   खास  ,मीच  आहे  खास.

आता  उतरोत्तर होईल  प्रगती  माझी.
कोणालाही  ना  मिळो  धड  भाकरी  ना  भाजी.
प्रत्येकजण  आहे  साला  माझाच  दास.
कारण  मी   खास  ,मीच  आहे  खास.

तुझ्या  अभिमानाला  मर्यादा  असावी.
तुला  सर्वात  समानता  दिसावी.
वेळीच  आवर  नाहीतर , अवेळी  जाईल  श्वास.
कारण  तोच  आहे  खास  ,फक्त  तोच  आहे  खास.


कवी : बाळासाहेब तानवडे

©बाळासाहेब तानवडे २६/११/२०१०

http://marathikavitablt.blogspot.com/

स्वप्नील वायचळ

chhan ahe.....chhan mandla ahe vichar

बाळासाहेब तानवडे

स्वप्नील, तुमच्या मोलाच्या अभिप्रायाबद्दल आभारी आहे.