मुलीचे नववी इयत्ता उत्तीर्ण झाल्याच्या निमित्ताने कौतुकास्पद पर कविता

Started by Atul Kaviraje, October 01, 2024, 09:05:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, एका ओळखीच्या मुलीचे नववी इयत्ता उत्तीर्ण झाल्याच्या निमित्ताने, तिच्या कौतुकास्पद पर एक कविता--

अग, किती गोड हसतेस तू
मनात लाडूच फुटत आहेत तुझ्या
लाडवांसारखीच गोड आहेस तू मुली,
आनंदाची बातमी देणार बहुधा तू.

चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालीस ना
पहिला नंबर मिळविलास तू ना
मला याची खात्रीच होती मुली,
दिवसरात्र अभ्यास केला होतास मुली.

 नववीची परीक्षा तशी असते कठीणच
SSC मध्ये करायचे असते पदार्पण
तुला सहज मिळून जाईल ADMISSION,
90% मार्क मिळवेल्स, दिलेस दाखवून.

हेही वर्ष आहे खूपच महत्त्वाचे
भविष्य अवलंबून SSC वर तुझे
आयुष्यात पुढे जाण्याची पहिली पायरी,
जीवनात अग्रेसर होण्याची कर तयारी.

तुला मोठं व्हायचंय, खूप शिकायचंय
आयुष्यात स्वतःच्या पायांवर उभं राहायचंय
स्वतःच्या कर्तृत्त्वाने सिद्ध करून दाखवायचंय,
आई वडिलांचे नाव अभिमानाने राखायचंय.

असो, ते ओघाओघाने होईलच सारं
आजच्या FUNCTION-ला तू हो तयार
PARTY योजिलीय तुझ्या घरच्यांनी तुझ्यासाठी,
घर आनंदाने बहरून गेलंय सारं.

आईने सकाळीच तुझी दृष्ट काढलीय
बाबांनी प्रेमाने तुझी पाठ थोपटलीय
दादाच्या पावलांनाही आज भिंगरी लागलीय,
बहिणीच्या कार्यक्रमाची सारी तयारी केलीय.

साऱ्या मैत्रिणी येतील थोड्याच वेळात
तुझ्याशी मिळवतील त्या अभिनंदनाचा हात
चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालीस तू,
स्वागत करतील तुझे टाळ्यांच्या गजरात.

तुझं मन आनंदाने मोहरून गेलंय
मधुर हास्य तुझ्या ओठांतून पाझरलंय
तुझा चेहराही हसतोय, डोळेही हसताहेत,
आनंदाचे झरे तुझ्या अंगोपांगांतून वाहताहेत.

साधेपणा मला तुझा अतिशय आवडला
सजली नाहीस, नटली नाहीस समारंभाला
निळा चुडीदार खरोखरंच शोभतोय तुला,
रेशमी मुलायम केस स्पर्शताहेत खांद्याला.
 
उधाण आलंय आज तुझ्या आनंदाला
भरारी घेतंय मन तुझं आभाळात
पंख पसरून उडतंय,  झेपावतंय, विहरतंय,
सूर मारतंय, पुन्हा भूईवरी येतंय.

तुझा आनंद तुझ्या हास्यातुन फुलतोय
आनंदाचा झुला उंच उंच जातोय
तुला नजर ना लागो कुणाची,
तुझा प्रत्येक हावभाव सुंदरच दिसतोय.

तुझ्या डोळ्यांत मला स्वप्न दिसतंय
स्वप्नांची पूर्तता आहे तुझ्याच हाती
मोठी हो, यशाचे गाठ शिखर,
सदिच्छांचा स्वीकार माझ्या, पुष्पहार सुंदर.

--अतुल परब
--दिनांक-01.10.2024-मंगळवार.
===========================================