गोफ

Started by sulabhasabnis@gmail.com, November 28, 2010, 06:41:01 PM

Previous topic - Next topic

sulabhasabnis@gmail.com

         गोफ
असताना शोधत साथ कुणाची
अचानक भेटलास तू
तुझ्या नजरेतला आर्जवी प्रश्न
माझ्या मनाला स्पर्शून गेला
नि नजरेने होकार दिला
आलो आपण एकत्र, चालू लागलो
एकमेकांच्या संगतीने
काही हळव्या  वळणांवर
सावरलेस तू मला
काही वाकड्या वाटांवर
साथ  दिली मीही तुला
कितीकदा बोललो-भांडलो आपण
एकमेकांना दूषणे देत
विसरून पुन्हा एक झालो, चालत राहिलो
काही धागे आणलेस तू, काही मी आणले
गुंफीत गेलो त्यांना हळुवार
संसाराचा सुंदर विणत गेलो गोफ
आज मागे वळून पाहताना वाटते
किती वेडे ठरलो असतो आपण
'मी' पण जपत राहिलो असतो
धाग्यांचा झाला असता गुंता
कधीही न उकलणारा
कधीही न उकलणारा
      ----------------
 

Rahul Kumbhar


sulabhasabnis@gmail.com