कल्पनांच्या नभात

Started by स्वप्नील वायचळ, November 29, 2010, 11:46:56 AM

Previous topic - Next topic

स्वप्नील वायचळ

          कल्पनांच्या नभात
कल्पनांच्या नभात घेऊ स्वच्छंद भरारी
मनविहंग माझे निघाले विहारी
प्रबळ इच्छा-शक्तीरूपी पंखांची साथ
कुणीही न अनुसरलेली नवी वाट

कल्पनांच्या नभात बंधनांना न जागा
काव्यवस्त्र जोडूनि शब्दांचा धागा
थोड्या शब्दात अर्थ मोठा सामावलेला
भावनांनी शब्द शब्द ओलावलेला

कल्पनांच्या नभात वांग्मयाची करू सेवा
नैवेद्य म्हणोनि अलंकारांचा मेवा
कल्पदेवीस काव्यचंदनाचा अभिषेक
खारीचा वाटा उचलू मारू या झेप

                      -स्वप्नील वायचळ

स्वप्नील वायचळ

#1
Watch, listen at this link

A Marathi Poem.wmv