मला भेटलेल्या एका सुंदर, हसऱ्या मुलीवर स्फुरलेली तितकीच सुंदर कविता

Started by Atul Kaviraje, October 02, 2024, 10:14:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, मला भेटलेल्या एका सुंदर, हसऱ्या मुलीवर मला स्फुरलेली तितकीच सुंदर कविता--

हर्षोत्फुल्ल, हर्षोल्हासीत, हर्षभरा तुझा चेहरा
भाव दिसतोय त्यात थोडा लाजरा-बुजरा
आनंदाचे तुझ्या कारण सांगशील मुली,
मनातून आनंद ओसंडून वाहतोय सारा.

मोहक हास्यात विस्फारलेत तुझे नयन
मधुर हास्यात विलगलीय ओठांची कमान
तुझा चेहराच सारं काही सांगतोय,
इतका का तुला आनंद होतोय ?

मनासारखीच गोष्ट घडलीय तुझ्या काहीतरी
आनंद उतू जातोय, उचंबळताहेत आनंद-लहरी
खूपकाही सांगायचंय ना तुला मुली,
अत्यानंदाने बोलणे सारे राहिलेय अंतरी.

सांगूनच टाक आता, बोल काहीतरी
नेऊ नकोस नुसतं तू हसण्यावारी
मोहक हास्य तुझं भावतंय मनाला,
चेहराही तुझा काही सांगून गेला.

नक्कीच काहीतरी कारण असावे आनंदाचे
हमखास काही निमित्त असावे हसण्याचे
हास्यातुन तुझ्या सुमने उधळत चाललीस,
हास्यातून सुंदर मनाचीच ग्वाही दिलीस.

असो, मी तुला विचारीत नाही
सांगायचे नसेल, नकोच सांगू काही
तुझा अबोलाच माझ्याशी बोलून गेला,
मनातला भाव तुझ्या मुखावर आला.

अग, किती सुंदर दिसतेस तू
मधुर, मधाळ, गोड हसतेस तू
तुझे नयन हसताहेत, ओठही हसताहेत,
ओळखलंस मनातलं, मला ते विचारताहेत.

हिरवा चुडीदार शोभून दिसतोय तुला
तुझ्या देहावर अगदी चपखल बसला
साधेपणा मज तुझा अतिशय आवडला,
सरळपणा तुझा मज बहु भावला.

गळा शोभतेय लोलक काळ्या सूत्रातले
कानी मोतीयांचे कर्णफूल सुंदर झुले
फक्त नावालाच चढविलास साज अंगावर,
तेवढयानेही खुलून आलंय तुझं सौंदर्य.

लांब केसांची देणगी तुला मिळालीय
खऱ्या अर्थाने सुकेशिनी तू झालीय 
मोकळे काळे केस सोडलेस खांद्यावर,
उडताहेत मनमोकळे ते खेळकर वाऱ्यावर.

किती अल्लड आहेस, भाबडी आहेस
षोडशवर्षीय तू अजून कुमारिकाच आहेस
या वयातही तू सुंदर दिसतेस,
किती मनमोकळं मनापासून तू हसतेस.

हास्य आहे, सुंदर मनाची पावती
असेच फुलत ठेव, उमलत ठेव
निरागस मनाचा आहे तो आरसा,
जपून ठेव, निसर्गाचा मिळालेला वारसा. 

--अतुल परब
--दिनांक-02.10.2024-बुधवार.
===========================================