मला नेहमीच भेटणाऱ्या आणि खूपच आवडणाऱ्या एका मुलीचे कवितारूपी वर्णन

Started by Atul Kaviraje, October 03, 2024, 09:45:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, मला नेहमीच भेटणाऱ्या आणि खूपच आवडणाऱ्या एका मुलीचे कवितारूपी वर्णन--

तुला रोजचं पाहावंसं मला वाटतं
तुला भेटायला रोजचं मला आवडतं
मुली, अतिशय सुंदर आहेस तू,
मुली, खूपच आकर्षक आहेस तू.

नवीन-नवीन पोषाखात मी तुला पाहतो
प्रत्येक रंग तुझ्यावर खुलून येतो
साधासा मेकअप केलास तरी चालेल,
तुझ्या रुपाला रोजच बहार येतो.

आजही फारच सुंदर तू दिसतेस
निर्मळ नयनांनी मजकडे पाहताना भावतेस
स्मितहास्य विलसतंय तुझ्या मोहक ओठांवर,
धून ऐकू येतेय सुमधुर, जिवणीवर.

मयूरपंखी पोशाख चांगलाच शोभतोय तुझ्यावर
मोकळे काळे केस रुळताहेत खांद्यांवर
हातात घातल्यास बांगड्या, कानात कर्णफुले,
झुळझुळीत रेशमी ओढणी खांद्यावर झुले.

पाहतेस प्रेमाने, किती निरागस चेहरा
उजळून निघालाय तुझा वर्ण गोरा
खट्याळ, अल्लड तुझ्या नजरेतला भाव,
तुझ्या रूपाचा मजवरी पडतोय प्रभाव,

अजून सोळावं लागायचंय मुली तुला
तुझ्या सौंदर्याला आताच बहार आला
कमनीय, शिडशिडीत बांध्याची तू बाला,
वर्णन करता, चेहरा आरक्त झाला.

--अतुल परब
--दिनांक-03.10.2024-गुरुवार.
===========================================