उद्यानात भेटलेल्या एका सुंदर मुलीशी झालेल्या वार्तालापाचे पद्य कवितारूपी वर्णन

Started by Atul Kaviraje, October 04, 2024, 09:53:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, एका सुंदर उद्यानात भेटलेल्या एका सुंदर मुलीशी झालेल्या वार्तालापाचे पद्य कवितारूपी वर्णन--

सुट्टीचा आनंद घेत आहेस तू
कालच परीक्षेतून मोकळी झालीस तू
स्वैर फिरायचेय ठरवलेस आज तू,
म्हणूनच या उद्यानात आलीस तू.
 
तुला बागेत यायला नेहमीच आवडतं
सुंदर फुलांनी भरलेली, बहरलेली, डवरलेली
सुगंध घेत तयांचा, रममाण होतेस,
डोळे मिटून श्वासात भरून घेतेस.

आजही तू आलीस या उपवनी
परिमळ कुसुमांचा घेतलास श्वासात भरुनी
स्वच्छंद, मुक्त फिरलीस मनमोकळी, मनापासून.
थकल्यावर शांत, निवांत राहिलीस बसून.

बाग आहे सुंदर, फुलांनी बहरलेली
कळी आलीय तुझी फुलुनी, उमलुनी
त्या फुलांमध्येच आहेस एक फुल,
नाजूक, सुंदर, आकर्षक, रंगीत, सुगंधीत.

छानच दिसतेस मुली तू आज
आवडला मला तुझा सुंदर साज
फुलांफुलांचा पोशाख शोभून दिसतोय तुला,
गोरा रंग तुझ्या देहावर उजळला.

वेशभूषा सुंदर, त्याहूनही केशभूषा अतिसुंदर
दोहो बाजूंस केश झुलती खांद्यांवर
फीत रिबिनीची लाल झुलतेय, लहरतेय,
निळ्या फ्रॉकवर, ओढणीवर खुलून दिसतेय.
 
हाती उजव्या मोतियांचा पट्टा सजला
घड्याळ सुबक, शोभले डाव्या मनगटाला
साधी तरी नीटनेटकी सजलीस तू,
याही वेशात सुंदरच दिसतेस तू.

हास थोडीशी, उगा नको राहूस
नुसतीच एकटक अशी नको पाहूस
तुझे हास्य नक्कीच गोड असेल,
समजेल जेव्हा ओठांची कमान खुलेल.

छान मजेत गेला आजचा दिवस
निमित्त नव्हतेच तुझ्या येण्याचे खास
तुझे मन येथेच खूप रमते,
उद्यानातच तुझ्या मनाला शांतता लाभते.

--अतुल परब
--दिनांक-04.10.2024-शुक्रवार.
===========================================