एका समारंभात मला भेटलेल्या सुंदर ललनेचे कवितेतून यथार्थ वर्णन

Started by Atul Kaviraje, October 05, 2024, 09:39:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, एका समारंभात मला भेटलेल्या सुंदर ललनेचे कवितेतून यथार्थ वर्णन--

बहूत दिसांनी रूप नजरेस पडले
नयनांत माझ्या ते भरत चालले
खिळवून ठेवतंय नजरेस रूप सुंदर,
गुलाब फुलताहेत तुझ्या गुलाबी गालांवर.

हतप्रभ, एकटक तुज पहात राहीलो
डोळ्यांतील मदिरेस नजरेने पित राहीलो
कळलेच नाही केव्हा धुंद झालो,
घाऱ्या डोळ्यांत तुझ्या जखडून गेलो.

हसत होतीस तू माझ्याचकडे पाहून
अन ओठांतून मधुर स्मितहास्य फेकून
झेलायचे मला भानच नव्हते राहीले,
माझे हृदयच मधुरे तू चोरले.

प्रीत ओसंडून वहात होती नयनांतून
झरत होते स्मितहास्य गुलाबी ओठांतून
भानावर आलो, जेव्हा तू विचारले,
लक्ष कुठाय तुमचं, कुठे हरवले.

अजूनही मी माझ्याच विचारात होतो
अनुपम सौंदर्य डोळ्यांनी प्राशीत होतो
तिच्या रूपाने मजवरी गारुडच घातले,
नयनांच्या बाणांनी हृदय छिन्न-भिन्न केले. 

असामान्य, अद्वितीय, अनुपम तिचे सौंदर्य
अंगोपांगांतून वहात होते रसरसलेले माधुर्य
आरसपानी रूप तिचे, लावण्य बहरलेले,
यौवनाचे घट भरून उतू चाललेले.

सुडौल बांधा तिचा, देह कमनीय
सौंदर्याची पुतळा, रूपाची देणगीच मिळालीय
कुठेही नव्हती तिच्या सौंदर्यात उणीव,
ठसठशीत, रसरशीत लावण्य तिचे ठाशीव.

झुळझुळीत साडी गुलाबी ल्यालीस सुंदर
खुलून आलीय तुझ्या गोऱ्या रंगावर
गुलाबी कंचुकी मेळ खातेय साडीवर,
अतीव आलाय तुझ्या रुपाला बहर.

मोकळे काळे कुंतल रेशमी, मुलायम
प्रेमातच पडलोय  त्यांच्या, झालोय गुलाम
अस्ताव्यस्त पसरलेत, विरामताहेत दोन्ही खांद्यांवर,
पाहून त्यांच्याकडे हटतच नाहीय नजर.

आहेस सुंदर, अदा तुझी त्याहूनही
पडायचाच राहीलोय, माझा तोल जाऊनी
किती सुंदर तुला ईश्वराने घडवलंय,
प्रमाणबद्ध शरीर तुला प्राप्त झालंय.

डावा हात भरलाय भरीव कंकणांनी
उजळताहेत मोती रुपेरी प्रभा फाकुनी
गळा शोभतेय तुझ्या सुवर्णाची सर,
कानात झुलताहेत रुपेरी डूल डौलदार.

साज नाहीय, नाही केलास शृंगार
तरीही तुझ्या सौंदर्याला आलीय बहार
लावण्याचा तुजपाशी आहे खजिनाच भरलेला,
अखंड, अमर्याद, सांभाळ तू त्याला.

गुंगवून ठेवलेस मला मोहक हास्यात
जखडून ठेवलेस मधुर गोड चेहऱ्यात
मी माझाच नव्हतो राहीलो आता,
प्रीतीचा अंकुर मनात रुजत होता.

--अतुल परब
--दिनांक-05.10.2024-शनिवार.
===========================================