माझी लठ्ठ बायको

Started by Atul Kaviraje, October 08, 2024, 04:32:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

माझी लठ्ठ बायको--

माझी लठ्ठ बायको, हसरी आणि मस्त,
तिच्या गप्पांनी सर्वांचे  होते मनोरंजन स्वस्त.
चविष्ट खाणं, तिचं आवडतं,
कधी पिझ्झा, कधी बर्गर, कधी करते चॉकलेट फस्त.

सकाळी उठते, विचारते झालाय चहा कसा ?
म्हणतो, "बायको, साखर कमी आहे थोडी"
ती हसून म्हणते, "माझ्या हाताला आहे गोडी !"
तिच्या हास्यातच सापडते, माझा आयुष्याची आनंदी होडी .

कधी करते सॅलड, तर कधी नुसत्याच भाज्या,
पण कधी कधी म्हणते, "हवय ना चिप्स आणि भजीया?"
अंगात जरी जाडवा, पण मनात गोडवा फार,
माझ्या लठ्ठ बायकोचं प्रेम, खरं सच्चं यार !

फिरायला जातो, तर ती म्हणते, "पायऱ्या नको"
"पायऱ्या चढताना झोक माझा जातो"
तिच ते हास्य, किती गोड आणि गडद,
कधी-कधी सगळं विसरतो, तिच्या प्रेमात हरवून जातो !

माझी लठ्ठ बायको, खास आहे तिचं रूप
तिच्या प्रेमाने भरलेलं, माझं जीवन सारं खूप
हसत-खेळत जगणे, तिच्यासोबत आहे खास,
माझी लठ्ठ बायको, खरे प्रेम, असं आहे थोडं गोड जसं !

--अतुल परब
--दिनांक-08.10.2024-मंगळवार.
===========================================