सहल

Started by स्वप्नील वायचळ, December 02, 2010, 01:53:10 PM

Previous topic - Next topic

स्वप्नील वायचळ

                         सहल

एकदा सगळ्या देवांनी सहल काढायचे ठरवले
एवढ्या मोठ्या विश्वामध्ये पृथ्वीला निवडले
उत्साहाने येऊन सगळे पाहतात तर काय
गजबजलेल्या जगात या ठेवू कुठे पाय

आले होते ते येथे शांतीच्या अपेक्षेत
दिसले त्यांना देश फक्त युद्धाच्या प्रतीक्षेत
स्वार्थासाठी मानवाने तोडली होती जंगले
धोक्यामध्ये आले होते पशु पक्षी सगळे

जिकडे तिकडे प्रदूषित जल वायू ध्वनी
अविवेकी मानवाला चिंता नाही मनी
मानवाच्या पापांचा भरला होता घडा
देवांनी ठरविले शिकवायचा धडा

अस्थमा स्वाइन फ्लू सारखे आले आजार
पूर दुष्काळ गर्मीने माणूस झाला बेजार
आपला स्वार्थ ठेवून त्याने निसर्गावर
कुऱ्हाड घेतली मारून आपल्याच पायावर

                           -स्वप्नील वायचळ