आपलासा अनोळखी

Started by mkapale, October 10, 2024, 12:18:19 PM

Previous topic - Next topic

mkapale

आपलासा अनोळखी

अश्या असतात व्यक्ती ज्या मनात घर करून जातात
जवळ न येऊनही , सदा आपलेसे बनून राहतात

विचारांनी त्यांच्या प्रभावित होतो आपण
करावं काही त्यांच्यासारखं निर्धार करतं मन

आभाळासारखं व्यक्तित्व त्यांचं सवय बनून जातं
सोडून गेले कि नकळत डोळ्यात टिपूस येतं

असे अनोळखी तरीही आपलेसे, जीवनात असावेत
त्यांच्या वागण्यातून चांगुलपणाचे स्पर्श लाभत जावेत

आपल्या परक्याची ओळख संभ्रमात टाकत असता
अश्या न भेटणाऱ्या आप्तांसोबत आयुष्य येतं जग