प्रेमात हरलेली, प्रेमभंग झालेली

Started by Atul Kaviraje, October 10, 2024, 10:16:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

प्रेमात हरलेली, प्रेमभंग झालेली--

प्रेमात हरलेली, प्रेमभंग झालेली
उदास, खिन्न, दु:खी चेहरा, तिचा आहे
कधीच ना जाणवला, तिला असा भास,
स्वप्नांच्या वाटेवर, का आला असा अंधार ?

त्या गोड क्षणांचा, आता झाला अंत
तिला बघून जाणवतंय, वाटतेय खंत
पुन्हा उजळणार का, तिच्या मनातली आस,
की आजच्या त्या क्षणात, फक्त गहिरा उदास?

सुखी संसाराची धरली होती आस
सुख कुठले, उलट झाला त्रास
आशा, स्वप्नं, सुखांचे सुंदर रंग,
सर्व काही मिटले, होऊन गेले बेरंग.

आता एकटीच ती, अन तिचा चंद्र
सुन्या गच्चीत, नाही पहात ती इतरत्र
मनाच्या गाभ्यात, साठलेले दुःख,
शोधतेय ती हरवलेले सुख.

प्रेमात हरलेली, जणू  जगणं थांबलं
पण जिवंत राहणं, शिकवितो हा काळ
उदास चेहरा, एकदा पुन्हा हसेल,
नव्या सुरुवातीने, प्रेम पुन्हा फुलेल.
 
--अतुल परब
--दिनांक-10.10.2024-गुरुवार.
==========================================