अंधारात तो आकाशाकडे एक टक बघत होता...

Started by Rushi.VilasRao, October 13, 2024, 06:07:42 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

काळया कुट्ट अंधारात तो आकाशाकडे एक टक बघत होता...
का कोणास ठावूक तो रात्री अपरात्री जागरण करत होता....
काळया कुट्ट अंधारात तो चंद्रशी काही तरी बोलत होता....
तुझ्या पेक्षाही ती सुंदर आहे म्हणत विषय तीझा मांडत होता...
Writer:-rushikesh kadam(मी स्वत:च)
सांगत होता चंद्राला
तीला पाहिलं की अस काय होवून जात,
माझ मन मला विसरून जात...
तीझ्या डोळ्यात पाहून भान माझं हरवून जात,
तीला घेवून मन नभात कुठे तरी उडून जात...
तीझ्या त्या रेशीम केसांच्या जाळ्यात मन माझं गुंफून जात...
तीझ्या गोड हसण्यान मन नकळत फसून जात,

तीझ वर्णन ऐकत चंद्र चांदण्या कडे मीश्किलीने पहात होता...
किती खोल पर्यंत बुडू शकतो आपण एखाद्या मधे हे पाहून चंद्र सुद्धा जणू नवीनच अनुभव घेत होता....
जग आपली उपमा दुसऱ्यांना देत पण हा आपल्याला तीची उपमा देतोय हे पाहून
तो ही मनातल्या मनात काही तरी विचार करत होता....
स्तुती तीझी ऐकून चंद्र ही जरासा चिडला होता...
पण त्याझी ती दशा पाहून शांत राहून निमूटपणे सर्व ऐकत होता....

Writer:-rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @K.rushi_bhaijaan