ते आम्ही!

Started by pralhad.dudhal, December 10, 2010, 05:31:53 PM

Previous topic - Next topic

pralhad.dudhal


ते आम्ही!

चुकिच्या उत्तरांची ती गणिते मांडतो आम्ही!
उत्तरांसाठी आभासी उगाच भांडतो आम्ही!

जीवन घडीचा डाव, जो उधळणार आहे,
जात धर्म प्रांता साठी हे रक्त सांडतो आम्ही!

नीती अनिती नियम कायदे ते कुणासाठी?
स्वार्थासाठी सगळे ते,खुंटीस टांगतो आम्ही!

हा जन्म जसा सत्ता नी संपत्ती साठीच आहे,
खुर्चीसाठी कुणाच्याही पायाशी रांगतो आम्ही!

ठकलो अनेक वेळा गिळले अपमान किती!
पड्लो जरी उताणे,नाक वरती सांगतो आम्ही!

                     प्रल्हाद दुधाळ.
                     9423012020

बाळासाहेब तानवडे



rudra


maartand

खुप छान! आवडली. पण 'विनोदी कविते' मधे का टाकलीये? तिची जागा इथे नाही. खरच खुप सुंदर. अजून काही येउदे ना.

swapneel.k

farach chhan mitra.....avadli kavita...mastach..... ;D

Pravin5000