प्रेमाला वयच नाही.

Started by charudutta_090, December 18, 2010, 08:07:16 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

प्रेमाला वयच नाही.
किती हाडं झिजले, तरी पळावस वाटतंच,
वास्तविक्तेत जगलं,तरी डोळे स्वप्नं थाटतंच.,
आयुष्य इतके मैल प्रवासलं तरी,पुढे जायला सरसावतंच,
इतके पावसाळे बघितले तरी,शृंगारिक धारा बरसावतंच.,
सगळं अनुभवलं तरी,नव्या अनुभवला वेडावतं,
अंगात विजेच्या झटक्त्यागत,रोमांच खडावतं.,
रोज दिसणार्या चंद्राला,पौर्णीमेसारखा खूलावतं,
पडवीवर बसलं तरी,समुद्रकिनारी झुलावतं.,
किती तहानलेलं व भुकेलं कि सदा वाटावं अतृप्त,
स्वतःला ह्यातच डूबावून वाटतं, राहावं जगाशी अलिप्त,
एक मुसळधार धबधब्याची हि धारा,जणू जिला कुठलं भयच नाही,
खरच,अख्खं जीवन जरी भोगलं,तरी प्रेमाला वयच नाही.
चारुदत्त अघोर.(१८/१२/१०)

sulu


dk

hi kavita samajanyasathi kharach ekada tari prem karav.
best luck.

sulu