"सोनपावलांनी दिवाळी दिव्यांची माझ्या घरी आली,जाताना सुखाचे दान मजला देऊन गेली."

Started by Atul Kaviraje, October 30, 2024, 07:07:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

"सोनपावलांनी दिवाळी दिव्यांची माझ्या घरी आली,
जाताना सुखाचे दान मजला देऊन गेली."

सोनपावलांनी दिवाळी दिव्यांची
माझ्या घरी आली
जाताना सुखाचे दान,
मजला देऊन गेली.

सोनपावलांनी दिवाळी आली
दिव्यांचं तेज मनाला भाळी
जाताना सुखाचं दान,
घरात भरलं आनंदाचं गान.

दिव्यांच्या प्रकाशात सजलं घर
सण साजरा, झाला घरभर
सोनपावलांनी भरलेले अंगण,
दिवाळीच्या दीपोत्सवात गातो गाणं.

दीपांची ज्योती, मनात रंग भरे
संपूर्ण विश्वात सुखाचा सुवास उरे
दिवाळीच्या या पावन रात्री,
पटली सुखाची, यशाची खात्री.

--अतुल परब
--दिनांक-30.10.2024-बुधवार.
===========================================