राणी झाशीची आहे, तुझ्यात अजून विरबाले

Started by Atul Kaviraje, October 31, 2024, 08:46:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

राणी झाशीची आहे, तुझ्यात अजून विरबाले-

राणी झाशीची आहे, तुझ्यात अजून विरबाले,
उपसून तलवार, अन्यायाचे तू नामोनीशाण मिटवले.

धैर्याची मूर्ती, तू आहेस अग्नीची धगधगती ज्वाला,
शत्रूंच्या मर्दना, पुरेसा आहे तुझा एकच प्रदीप्त शोला. 

जंगल वाघांनी भरलेले, दाखवतेस एकलीच वाघिणीचे धैर्य,
बाणा तुझा शिकाऱ्याचा, वेळप्रसंगी तू दाखवतेस शौर्य.

अत्याचार सहलेस, सहनशक्तीची तू आहेस मूर्ती 
तुझी शौर्यगाथा, पुढच्या पिढीस सांगेल तुझी कीर्ती.

झाशीच्या राणीची कथा, आजही वाचली जाते,
तुझ्या नसानसांत कडकती वीज प्रज्वलित होते.

राणी झाशीची आहे, तुझ्यात अजून जागी,
तुटून पड शत्रूवर, उपसून तलवार नंगी.
 
--अतुल परब
--दिनांक-31.10.2024-गुरुवार.
===========================================