स्वागता उभी तुझ्या, हाती घेऊन मंगल कऱ्हा

Started by Atul Kaviraje, October 31, 2024, 08:47:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

"स्वागता उभी तुझ्या, हाती घेऊन मंगल कऱ्हा,
दिवाळी, प्रकट तू तेजाने, कर सर्व संकटांचा निचरा."
 
स्वागता उभी तुझ्या
हाती घेऊन मंगल कऱ्हा
दिवाळी, प्रकट तू तेजाने,
कर सर्व संकटांचा निचरा.

हातात आहे मंगल कऱ्हा
दीपांचा प्रकाश, उजळतोय घरा
तुझा सण घेऊन येतो प्रकाश ,
अंधाराचा सरसकट करतो विनाश.

तुझे तेज देते मनाला शांती
कडवटपणा दूर करून जोडते नाती
स्वागत तुझे दिवाळी, तुझे विविध रंग, 
शांतता, समृद्धी, सुखाचा करतेस संग.

तुझ्या सौंदर्यात सजलेले जग
प्रकाशाचा उजाळा, करतोय लखलख
दिवाळी उत्साही करतोय तुझा निवास,
उजळतोय, जोडतोय प्रत्येकाच्या मनास !

सर्वांमध्ये वाढवलास तू आनंद
निर्मिलास मनामनांत प्रेमाचा सुसंवाद
स्वागत तुझे, करते माझे सु-मन,
तुझा सण, समृद्ध करतेय जीवन !

--अतुल परब
--दिनांक-31.10.2024-गुरुवार.
===========================================