कशाला?

Started by pralhad.dudhal, December 24, 2010, 06:57:55 PM

Previous topic - Next topic

pralhad.dudhal

कशाला?

तुझ्या माझ्या जगी, जमाना कशाला?
रोज तुझा नवा, बहाना कशाला?

जगणे इथे महाकठिण झाले,
अर्ध्या घासात या, पाहुणा कशाला?

नशिबाची बात, नियतीची खेळी
एकमेकांवरी, निशाना कशाला?

कटू ही कहाणी, जगण्याची आहे
दाखविण्या खोटा, मुलामा कशाला?

माथेफ़िरूंचे राज्य, खुळ्यांची वस्ती
जगी एकटा या, शहाणा कशाला?

               प्रल्हाद दुधाळ.

Omkarpb

कविता छानच आहे , तोड नाही तिला
पण 'प्रेम कविता' मध्ये "कशाला ?" कशाला ?

rudra