Secret

Started by बाळासाहेब तानवडे, December 24, 2010, 11:43:40 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे


Secret


निसर्गाचा आकर्षण नियम आता सिद्ध आहे.
इच्छित पैसा ,मनाजोग प्रेम आता सहज साध्य आहे.
हे ऐकून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलावं.
आणि जीवनाचं रहस्य आता सर्वास कळावं.

निसर्गाला तुमचा आदेश कळेल, इप्सित साध्य हमखास मिळेल.
सुखांचा वर्षाव होऊ लागेल, जणू अलाउदिनचा जादुई दिवाच लाभेल.
म्हणून सर्वांचच जीवन ,सुख-समृद्धीने वहाव.
आणि जीवनाचं रहस्य आता सर्वास कळावं.

दु:ख उगाळून दुःखच मिळेल,कल्पित सुखाने सुखच बरसेल.
थोडं मागा प्रचिती मिळेल,विश्वास निसर्ग नियमांवर बसेल.
यासाठी 'Rhonda Byrne' चे 'Secret' पहाव.नाहीतर मातृभाषेत 'रहस्य' वाचावं.
आणि जीवनाचं रहस्य आता सर्वास कळावं.

© बाळासाहेब तानवडे – २४/१२/२०१०
http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/